महेश गुजराथी चांदवडपंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील मेसनखेडे हा गण अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून, या गणात सत्तेसाठी आसूसलेल्या सर्वांची गोची झाली असून, त्यांना आता एकतर गटात उभे राहावे लागेल अन्यथा घरी तरी गप्प बसावे लागेल, अशी स्थिती झाली आहे. वागदर्डी ऐवजी नव्याने अस्तिवात आलेल्या मेसनखेडे खुर्द गणात पूर्वीच्या दुगाव गणातील दरेगाव, मेसनखेडे खुर्द, मेसनखेडे बुद्रुुक, कोकणखेडे ही गावे समाविष्ट झाल्याने हा गण एकसंघ झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या आशा उंचावल्या आहेत; मात्र आरक्षणामुळे अनेकांना नाराजी पत्करावी लागली आहे. हा गण पूर्वी वागदर्डी या नावाने होता तर त्यापूर्वी शिंगवे गण नावाने होता. या गणातील सत्ता बराच काळ कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची, तर पूर्वीपासूनच हा गण कॉँग्रेस विचारांचा आहे. या गणातून रामदास माधव कोल्हे १९९२ ते १९९४ पावेतो सभापती होते. त्यानंतर वाद येथील चंद्रभान सावळीराम भालेराव हे १९९८ ते १९९९ पावेतो, त्यानंतर भडाणे येथील शिवाजी यमाजी अहेर हे १९९९ ते २००० पावेतो व दहेगाव मनमाडचे नामदेवराव धोंडीबा गिडगे हे २००९ मध्ये सभापती झाले होते. हे सर्वच माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या मार्गदर्शनाने कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.वागदर्डी गणात राष्ट्रवादीच्या सविता उद्धव चौधरी (४१२०) मते मिळवून विजयी झाल्या, तर पराभूत उमेदवारांत गयाबाई कडनोर (४६५), गयाबाई काळे (१५३८), गीता झाल्टे (३३०१) एकूण ९ हजार ४२४ मते. मिळाली होती. असा या मेसनखेडे गणाचा इतिहास आहे. या गणात हटकर, धनगर व मराठा मतदार व इतर सर्व जाती धर्माचे आहेत. या गणात एकूण १२ गावे असून, लोकसंख्या २४,५९३ आहे.
शिवसेना भाजपात काट्याची टक्कर
By admin | Published: February 04, 2017 1:06 AM