चौकट-
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा असून, नुकत्याच झालेल्या घटनादुरुस्तीमुळे आता राज्यांना अधिकार मिळाले असल्याने महाराष्ट्र सरकारने मराठा समाजास दहा ते बारा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. केंद्र सरकार केवळ एका समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. यासाठी देशातील सर्व क्षत्रियांना दहा ते बारा टक्के आरक्षण द्यावे, अशी आमची भूमिका असून, त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले.
चौकट-
शिष्यवृत्ती वाढीसाठी प्रयत्न
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून, या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे वेळेत मिळण्यासाठी वेळच्या वेळी पैसे पाठविले जातात. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना केंद्र शासनाच्या वतीने अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते या रकमेतही वाढ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले.