मालेगाव : बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील व्यापाºयाकडील कांदा विक्रीचे पैसे शेतकºयांना परत मिळवून देण्यास बाजार समिती पदाधिकारी व प्रशासन असमर्थ ठरत असल्याने संतप्त शेतकºयांनी व प्रहार संघटनेच्या पदाधिकाºयांनी शनिवारी येथील उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करून उपनिबंधकांना घेराव घालून संचालक मंडळाला धारेवर धरले होते. दरम्यान, १४ मे रोजी बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात येऊन शेतकºयांचे पैसे न देणाºया व्यापाºयांवर काय कारवाई करता येईल याबाबत चर्चा करणार असल्याचे लेखी आश्वासन उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे यांनी दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. कांदा विक्रीचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांची मालमत्ता विक्री करा, शेतकºयांचे पैसे अदा करा, पैसे काढून देण्यास असमर्थ ठरलेले संचालक मंडळ बरखास्त करा. वेळप्रसंगी त्यांच्याकडूनच रक्कमा वसूल करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. व्यापारी व बाजार समिती शेतकºयांची फसवणूक करीत आहे. संचालक मंडळाच्या भूमिकेमुळे संपूर्ण प्रकरणच दाबून टाकले जाण्याची भीती शेतकºयांनी यावेळी व्यक्त केली. उपनिबंधकांनी या प्रकरणाची दखल घेऊन संचालक मंडळ बरखास्त करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकºयांनी लावून धरली होती. बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव व उपसभापती सुनील देवरे यांनी मुंगसे खरेदी-विक्री केंद्रावरील जय भोलेनाथ ट्रेडर्स कंपनीचे व्यापाºयाकडे अडकलेले पैसे घेण्यासाठी बांगलादेशला शिष्टमंडळ जाऊन आले. व्यापारी शिवाजी सूर्यवंशी यांना बांगलादेशला थांबून पैसे वसूल करून येतील. तेथील व्यापारी ५० लाख स्वत: व त्यांच्या संपर्कातील पिंपळगाव बाजार समितीतील एक व्यापारी ५० लाख देणार आहे. पैसे मिळण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. तोपर्यंत शेतकºयांनी संयम ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन केले. मात्र संतप्त शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते. यानंतर संचालकांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला. त्यानंतर उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे यांच्या कारवाई संदर्भातील प्रश्नांचा भडिमार करीत धारेवर धरण्यात आले. निर्णयाची माहिती शेतकºयांना दिली जाईल, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास १५ मे रोजी उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर पगार यांनी दिला. या आंदोलनात प्रभाकर शेवाळे, देवा पाटील, विलास मुंडे, किरण गवळे, चंदू शेवाळे, कल्याण शेवाळे, बाळू सावकार, निवृत्ती जाधव, संतोष शेलार, अतुल पवार, रतन धोंडगे, सुनील आहिरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ठिय्या : कांद्याचे पैसे व्यापाऱ्यांकडे अडकल्याने शेतकरी संतप्त मालेगावी उपनिबंधकांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:19 AM
मालेगाव : बाजार समितीच्या व्यापाºयाकडील कांदा विक्रीचे पैसे शेतकºयांना परत मिळवून देण्यास प्रशासन असमर्थ ठरत असल्याने संतप्त शेतकºयांनी व प्रहार संघटनेच्या पदाधिकाºयांनी शनिवारी येथील उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करून उपनिबंधकांना घेराव घालून संचालक मंडळाला धारेवर धरले होते.
ठळक मुद्देपैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांची मालमत्ता विक्री कराव्यापारी व बाजार समिती शेतकºयांची फसवणूक करीत आहे