वाडीवºहे : येथील थायसनकृप इलेक्ट्रिक स्टील इंडिया प्रा.लि.(टीकेईस) कंपनीतील कामगारांनी वेतनवाढीसाठी व इतर मागण्यांसाठी गुरुवारपासून संप पुकारला असून, सर्व कामगार कंपनी प्रवेशद्वारावर बसले आहेत.इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे गोंदे औद्योगिक वसाहतीतील थायसनकृप इलेक्ट्रिक इंडिया (पूर्वीची रेमंड स्टील) ही सर्वात मोठी कंपनी असून, या कंपनीत २५४ कायमस्वरूपी कामगार, २४ हंगामी कामगार आणि २८० कंत्राटी कामगार काम करीत आहेत. कायमस्वरूपी कामगारांनी कामगार उत्कर्ष सभा या संघटनेमार्फत कंपनी व्यवस्थापनाकडे लेखी व तोंडी स्वरूपात मागण्या मांडल्या; मात्र कंपनी प्रशासनाने त्या फेटाळल्या. त्यानंतर कामगारांनी १८ फेब्रुवारीस कंपनीला संपाची नोटीसही दिली; मात्र कंपनीने दाद न दिल्याने कामगारांनी संप सुरू केलाअनाशिकच्या सहायक कामगार आयुक्तांकडे हे प्रकरण प्रलंबित आहे आणि समेटासाठी त्यांनी ते दाखल करून घेतले असून, सोमवारी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे ठरले आहे; मात्र कामगारांनी अचानक पुकारलेला हा संप बेकायदेशीर आहे. गेल्या सात वर्षांपासून कंपनी तोट्यात असतानाही पगारवाढ देण्याची तयारी व्यवस्थापनाने दाखविली. त्यामध्ये गुरुवारी वाढही केली; मात्र कामगारांनी आडमुठी भूमिका स्वीकारून संप पुकारला आहे.- व्यवस्थापक, थायसनकृप इलेक्ट्रिक स्टील इंडिया कंपनी.ाहे.कामगारांना गेल्या अकरा महिन्यांपासून वेतनवाढ नाही तसेच कंपनीकडे सात मागण्या केल्या आहेत; मात्र त्याकडे लक्ष न दिल्याने हा संप करीत असल्याचे कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी यांनी सांगितले.कोटसंप बेकायदेशीर; व्यवस्थापनाचा दावाफोटो (१४वाडीवºहे):
थायसनकृप कंपनीचे कामगार बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:54 AM