मालेगाव : राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. लॉकडाऊनचा निर्णय रद्द करावा, रमजान काळात प्रार्थना स्थळे खुली करावीत, सर्वसामान्य नागरिकांना करात सूट द्यावी या मागण्यांसाठी जनता दलाने आक्रमक भूमिका घेत मंगळवारी येथील किदवाई रस्त्यावर महिलांनी थाळीनाद आंदोलन केले. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जनता दलाच्या नगरसेविका शान - ए - हिंद, माजी महापौर साजेदा निहाल अहमद यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी किदवाई रस्त्यावर शहरातील विविध भागातून आलेल्या महिलांनी थाळीनाद आंदोलन केले. लॉकडाऊन रद्द करा, अशा घोषणा देण्यात आल्या. राज्य शासन व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना कर सवलतीत सूट देत नाहीत. सर्वसामान्य नागरिक कोरोनाने नाही तर भूकबळीने जास्त मरतील. काही राज्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जात आहेत. मात्र उद्योग ठप्प केले जात आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. घर चालविण्यासाठी पैसे लागतात. महिलांचा याच्याशी जवळचा संबंध आहे. केंद्र व राज्य शासनाला जाग यावी. निर्बंधामध्ये सवलत मिळावी. दुकाने, प्रार्थना स्थळे सुरू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात नगरसेविका शान - ए - हिंद यांच्यासह जैबुन्निसा अब्दुल बाकी, शबीया मुज्जमिल, सलीमा मन्सूर अहमद, फरीदा मुख्तार, महेरुन्नीसा अशफाक यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
फाेटो फाईल नेम : १३ एमएपीआर ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी लॉकडाऊन विरोधात जनता दलातर्फे करण्यात आलेले थाळीनाद आंदोलन.
फाेटो फाईल नेम : १३ एमएपीआर ०२ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी लॉकडाऊन विरोधात झालेल्या थाळीनाद आंदोलनाप्रसंगी बोलताना जनता दलाच्या नगरसेविका शान - ए - हिंद निहाल अहमद. समवेत महिला.
===Photopath===
130421\13nsk_27_13042021_13.jpg~130421\13nsk_28_13042021_13.jpg
===Caption===
कॅप्शन बातमीसोबत दिले आहे. ~कॅप्शन बातमीसोबत दिले आहे.