शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद मोर्चा

By admin | Published: December 15, 2015 12:20 AM

अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद मोर्चा

नाशिकरोड : सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांकरिता राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी ‘थाळीनाद’ मोर्चा काढून निवेदन दिले. अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी के. जे. मेहता हायस्कूल येथून नाशिक-पुणे महामार्गाने बिटको चौक मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या हजारो अंगणवाडी सेविकांनी जोरदार थाळीनाद करत व घोषणा देत काढलेला मोर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्याने नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.विभागीय आयुक्त कार्यालय येथे मोर्चा अडविल्यानंतर विभागीय अपर आयुक्त के.डी. कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे हे मोर्चेकऱ्यांसमोर आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येऊन तुमच्या मागण्या या लवकरच शासनाला कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले. मोर्चामध्ये सफाई कामगार नेते मिलिंद रानडे, अंगणवाडी कर्मचारी संघाचे बृजपाल सिंह, मंगला सराफ, युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, कल्पना गायकवाड आदिंसह उत्तर महाराष्ट्रातील हजारो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)