सिडको : दिवसरात्र जे पोलीस डोळ्यात तेल घालून समाजाची सुरक्षितता जोपासतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाशिकची आई - गोदामाई व सांस्कृतिक कला मंडळ या संस्थांच्या वतीने त्यांना झाडे भेट देत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून हा दिवस साजरा करण्यात आला. शहरात सर्वच पोलीस ठाण्यांत विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने पोलीस स्टेशनला भेट देत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेत थँक्स टू नाशिक पोलीस म्हटले. सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस अधिकारी तुषार चव्हाण, संतोष खडके, शिवाजी आहिरे, राकेश शेवाळे, सुजित मुंढे, हरेश्वर घुगे यांच्यासह पोलीस कर्मचारी विजय शिंपी, बापू देव, प्रवीण जाधव, महेश जाधव, सुनील शिंदे, विलास सोनवणे, गणेश भामरे, दिलीप भदाणे, मारु ती फड, अनिरु द्ध येवले, कैलास निंबेकर आदींसह सर्वच पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना झाडे व गुलाबपुष्प भेट देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिवसेना मध्य नाशिक विभागाचे प्रमुख नाना काळे यांच्या वतीने भद्रकाली पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस अधिकाºयांसह कर्मचाºयांचा सन्मान करून पोलीस बांधवांचे आभार मानण्यात आले. यावेळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, वरिष्ठ अधिकारी कमलाकर जाधव, काळे, मोहिनी लोखंडे, मिलिंद परदेशी, केदारे आदी अधिकारी व कर्मचारी बांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नाना काळे, अजमल खान, कमलेश परदेशी, संजय चिंचोरे, पिंटू कानडे, मजीद पठाण, स्वप्निल घुमरे, निखिल पाटील आदी उपस्थित होते.
अंबड पोलीस ठाण्यात कृतज्ञता दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:19 AM