सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या पेलिकन पार्कचा तिढा सुटला असून, याठिकाणी महापालिका व शासन सुमारे ३४ कोटी रुपये खर्च करून सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असल्याने पार्कचे रूपडे बदलणार असून, यामुळे नाशिक शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मात्र सेंट्रल पार्कचे उद््घाटन होण्याआधीच श्रेयवाद सुरू झाला आहे.शुक्रवारी (दि.१४) झालेल्या सिडकोच्या प्रभागसभेत याचे पडसाद उमटताना दिसले. पेलिकन पार्कच्या जागेचा सिडकोवासीयांसाठी मोठा प्रकल्प उभारण्यात यावा यासाठी आजी-माजी नगरसेवक, आमदारांसह सर्व पक्षांच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला असल्याने यात श्रेयवाद न करता सेंट्रल पार्क लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.सिडकोतील मोरवाडीजवळ गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या पेलिकन पार्कचा तिढा सुटावा याासाठी आजी-माजी नगरसेवक, आमदारांसह विविध राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आता पेलिकन पार्कच्या १७ एकर जागेत सेंट्रल पार्क उभाण्यात येत असून, यासाठी सुमारे ३४ कोटी १२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत प्रभाग सभेत उद्यान विभागाचे प्रमुख शिवाजी आमले यांनी माहीती देताना सांगितले की येत्या महासभेत प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. प्रस्तावित जागेत पंचवटीच्या पाच झाडांची संकल्पना धरून पार्कचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ‘सुपर ट्री’ या नावाने पाच मनोरे या पार्कमध्ये उभारले जाणार असून, सौर ऊर्जा आकर्षण, जलसंवर्धन व व्हर्टिकल गार्डन या तीन पर्यावरणपूरक बाबींवर हे ‘सुपर ट्री’ आधारित ठेवण्यात येणार आहे. १५ ते १८ मीटर उंचीवर या मनोऱ्यांवरून शहराचे सौंदर्य पाहता येऊ शकणार आहे.
‘सेंट्रल पार्क’ साकारण्याआधीच श्रेयवाद उफाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 1:12 AM
गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या पेलिकन पार्कचा तिढा सुटला असून, याठिकाणी महापालिका व शासन सुमारे ३४ कोटी रुपये खर्च करून सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असल्याने पार्कचे रूपडे बदलणार असून, यामुळे नाशिक शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मात्र सेंट्रल पार्कचे उद््घाटन होण्याआधीच श्रेयवाद सुरू झाला आहे.
ठळक मुद्देसिडको प्रभाग : प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यावर एकमत