चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारात शुक्रवारी (दि.४) रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास वेगाने चांदोरीकडे जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट किराणा दुकानात जाऊन धडकली. यात किराणा दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.खेरवाडी रस्त्यावर चांदोरीकडे जाणारी कार (एमएच १५ एचएम ५५८) भरधाव वेगात होती. सदर गाडीवर गिरणारे येथील राहुल भोर हे चालक होते. यावेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट रस्त्यालगत असणाऱ्या विठ्ठल किराणा अँड जनरल स्टोअर या दुकानात घुसली. कार इतकी वेगात आली की दुकानातील काउंटर आणि सामान अक्षरशः बाहेर फेकले गेले. यावेळी चालक भोर यांनी गाडी तेथेच टाकून पळ काढला. चालक दारूच्या नशेत गाडी चालवत असल्यामुळे ताबा सुटल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या सर्व थरार घटनेचा व्हिडिओ शेजारच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. कार किराणा दुकानात घुसल्याने दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. कारचालकाने सेफ्टी बेल्ट लावला असल्याने एअर बॅग उघडली. त्यामुळे चालकाला कुठलीही दुखापत झाली नाही. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट किराणा दुकानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2022 10:55 PM
चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारात शुक्रवारी (दि.४) रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास वेगाने चांदोरीकडे जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट किराणा दुकानात जाऊन धडकली. यात किराणा दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देचांदोरीतील घटना : दुकानाचे मोठे नुकसान