नाशिक : महापालिकेची परिवहन सेवा असलेल्या नाशिक महानगर परीवहन महामंडळाच्या ठेकेदाराने दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने वाहकांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू केलेले आंदोलन अखेरीस ठेकेदार आणि सिटी लिंक कंपनीच्या चर्चेनंतर मिटले आहे. मे आणि जून असे दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कालपासून सिटी लिंकच्या पाचशे वाहकांनी मंगळवारपासून काम बंद आंदोन पुकारले हेाते, यासंदर्भात बुधवारी (दि.१९) महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत सिटी लिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी तसेच महाव्यवस्थापक मिलींद बंड आणि वाहन चालक पुरवणाऱ्या ठेकेदार मॅक्स डिटेक्टीव्ह ॲंड सिक्युरीटी सव्हीसेसचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली.
यावेळी तोडगा काढण्यात आला. ठेकेदार कंपनीने २१ जुलैच्या आत वाहकांना वेतन देण्याचे आदेश देण्यात आले तसेच तर दंडामुळे आर्थिक अडचणीत असल्याचा दावा करणाऱ्या ठेकेदाराच्या सर्व दंडात्मक रकमेबाबत ३१ जुलै पर्यंत अहवाल सादर करण्याचा निर्णय बुधवारी (दि.१९) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. झाल्यानंतर या संदर्भात तोडगा निघाला. त्यानंतर सायंकाळपासून बस सेवा पूर्ववत करण्यात आली.