सुयोग जोशी
नाशिक - नागरिकांना स्वच्छतेबाबत आवाहन करणाऱ्या नाशिक महापालिकेच्या मुख्यालयातील शौचालयांचीच अवस्था खराब असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या पाहणीत उघड झाले. दरम्यान सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक असे बिरुदावली मिरवणाऱ्या पालिका मुख्यालयातील स्वच्छतागृहाच्या स्थितीवरुन आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत मुख्यालयातील शौचालयांच्या नुतणीकरनाच्या सूचना दिल्या.
संपूर्ण नाशिक शहराचा कारभार महापालिकेच्या ज्या मुख्यालयातून चालवला जातो. तेथील शौचालयाची आयुक्तांनी अचानक पाहणी केली. यापूर्वी या शौचालयांच्या अवस्थेवरुन कर्मचारी, नागरिकांकडून तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. मात्र त्याकडे दूर्लक्ष करण्यात आले. आयुक्तांनी शौचालयाची पाहणी केली असता त्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान शहरात कोट्यावधीची कामे करणाऱ्या पालिका मुख्यालयातील चांगल्या प्रकारचे शौचालय नसने हा मोठा विरोधाभास आहे. शौचलयाची अवस्था खराब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नुतनीकरण केले जाणार आहे. आयुक्तांना पाहणीत काही शौचालयामधील दरवाजे खराब दिसले, नळांना पाणीच न येणे, व्यवस्थित स्वच्छता न होणे असे चित्र दिसून आले. दरम्यान, पंधरा वर्षापेक्षा ही शौचालय असल्याने त्यांची अवस्था खराब झाली आहे. महापालिकेत हजारो कर्मचाऱ्यांबरोबरच दररोज मोठया संख्येने नागरिक त्यांची विविध कामे घेउन येतात. परंतु हे शौचालय ज्या पद्धतीने ठेवायला हवेत. तसे ते ठेव्ले जात नसल्याचे चित्र आहे. स्वच्छता गृहांची तातडीने नूतनीकरण करण्याच्या सूचना संबधीत विभाग प्रमुखांना देऊन त्या बाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड, कार्यकारी अभियंता जितेद्र पाटोळे, सचिन जाधव यांसह मनपा अधिकारी उपस्थित होते.