नाशिक : ग्रामदेवता कालिका मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. सुरक्षिततेच्यादृष्टिने यात्रोत्सवावर ३५ सीसीटीव्हींची नजर राहणार आहे. ४० पुरूष व महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात्रोत्सव काळात महापालिकेतेर्फे प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे, याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेशही बैठकीत देण्यात आले.
नवरात्रोत्सवाच्या पाश्व'भूमीवर मंगळवारी कालिका माता सभागृहात महापालिक, पाेलीस आयुक्तालय व कालिका माता देवस्थानसह स्टॉलधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. नवरात्रोत्सवाचे विशेष महत्त्व असल्याने भाविकांसाठी २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बैठकीस कालिका माता देवस्थानचे अध्यक्ष केशवराव पाटील, सचिव प्रतापराव कोठावळे पाटील, खजिनदार सुभाष तळाजिया, पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी, महापालिकेचे घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्यासह मनपातील अधिकारी, कर्मचारी, स्टॉलधारक उपस्थित होते.कोजागिरीपर्यंत यात्राजास्तीत जास्त भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी यात्रा कालावधी कोजागरी पोर्णिमेनिमित्त वाढविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात अजून अंतिम निर्णय झाला आहे. गाभाऱ्यातील महालक्ष्मी, महासरस्वती व महाकालि यांच्या सुंदर मूर्ती भाविकांचे आकर्षण असतात. त्यामुळे यात्रा कालावधी वाढविण्याचा विचार संस्थानच्यावतीने करण्यात आला आहे.