नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि. ३०) कोरोनाबाधितांचा आलेख घसरल्याचे दिसून आले. दिवसभरात ९५७ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर २ हजार ४०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बाधितांमध्ये नाशिक शहरातील ७०८, ग्रामीण भागातील २१४, मालेगावातील १०, तर जिल्ह्याबाह्य २५ जणांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात ५ रुग्णांना जीव गमवावा लागला.
जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून सरासरी अडीच हजार कोरोनाबाधित आढळून येत असताना रविवारी त्यात अचानक मोठी घट झाल्याचे दिसून आले. मात्र, मृत्यूच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. मागील तीन दिवसांपासून मृत्यूची संख्या पाचवर पोहोचली आहे. रविवारी नाशिक शहरातील २, ग्रामीण भागातील २, तर मालेगावी एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या ८ हजार ८०६ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत १५ हजार ५४९ सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी १३३ रुग्ण ऑक्सिजनवर, तर २६ रुग्ण व्हेंटिलेटवर आहे, रविवारी सायंकाळी ५१५ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित होते.
-------
आठवडाभरातील रुग्णवाढ
२५ जानेवारी : २,९४४
२६ व २७ जानेवारी : ४,६९६
२८ जानेवारी : २६५६
२९ जानेवारी : २,३३८
३० जानेवारी : ९५७