ओझरटाऊनशिप : येथील एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या इसमास ओझर गुन्हे शोध पथकाने जालना येथून मुलीसह ताब्यात घेत ओझर येथे आणले व मुलीस तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले असून, संशयित आरोपीस अटक केली आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.२६) रात्रीच्या सुमारास ओझर येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. याबाबतची तक्रार रमेश गुणगुणे यांनी ओझर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या मुलीचा शोध घेण्याच्या सूचना ओझर पोलिसांना दिल्या. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना तोडमल, गुन्हे शोध पथकाचे किशोर अहिरराव, अनुपम जाधव, जितेंद्र बागुल हे अपहरण झालेल्या मुलीचा व आरोपीचा शोध घेत असतानाच ही मुलगी जालना जिल्ह्यातील मंठा येथे असल्याची गुप्त बातमी पोलिसांना लागली. ओझर गुन्हे शोध पथकाने जालना येथे जाऊन मुलीचा शोध घेण्याचे काम सुरू केले असता मुलगी उसाच्या शेतामध्ये असल्याचे त्यांना समजले.त्याठिकाणी जात पोलिसांनी संशयित आरोपी राकेश डोले (रा. नांदगाव) यास मुलीसह एका झोपडीमधून पंचासमक्ष ताब्यात घेतले. त्या दोघांना ओझर येथे आणल्यानंतर मुलीस तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले.संशयित राकेश डोले यास अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना तोडमल, गुन्हे शोध पथकाचे किशोर अहिरराव, अनुपम जाधव, जितेंद्र बागुल व होमगार्ड योगेश जाधव यांनी केली अधिकचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना तोडमल, पोलीस नाईक स्वप्निल जाधव करत आहेत
अपहरण करणाऱ्या इसमास जालना येथुन मुलीसह घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 00:07 IST
ओझरटाऊनशिप : येथील एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या इसमास ओझर गुन्हे शोध पथकाने जालना येथून मुलीसह ताब्यात घेत ओझर येथे आणले व मुलीस तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले असून, संशयित आरोपीस अटक केली आहे.
अपहरण करणाऱ्या इसमास जालना येथुन मुलीसह घेतले ताब्यात
ठळक मुद्देमुलगी आईवडिलांच्या ताब्यात : ओझर गुन्हे शोध पथकाची कामगिरी