नाशिक : बँकेने जप्त केलेली प्रॉपर्टी कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवून दाेघांनी नऊ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशोक अप्पाजी लहामगे (वय ५८, रा. श्रमिकनगर, सातपूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. ते घराच्या शोधात होते. या दरम्यान आरोपी राहुल वासुदेव भडांगे (वय ३२, रा. तांबे मळा, शांतीनगर, पंचवटी) व सोमनाथ विकुल धात्रक (वय ३६, रा. हमालवाडी सोसायटी, पेठ रोड, नाशिक) यांनी संगनमत करून लहामगे यांच्याशी संपर्क साधला. बँक ऑफ महाराष्ट्रच्या गडकरी चौक शाखेने जप्त केलेली प्रॉपर्टी /घर लिलावामध्ये कमी किमतीत मिळवून देण्याचे आश्वासन देऊन आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी लहामगे यांनी आरोपी भडांगे व धात्रक यांना दलालीपोटी सप्टेंबर २०२३ मध्ये नऊ लाख रुपये दिले होते; मात्र आरोपींनी प्रॉपर्टी किंवा घर न देता फसवणूक केली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत.
कमी किमतीत प्रॉपर्टीचे आमिष; नऊ लाखांची फसवणूक
By दिनेश पाठक | Published: April 19, 2024 11:25 PM