नाशिक :
थकबाकीदारांकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा लिलाव करण्याच्या प्रक्रीयेला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठल्याने आता या जप्त वाहनांचा लिलाव करण्यासाठी नााशिक जिल्हा बँक सज्ज झाली आहे. थकबाकीदारांनी जप्ती वाहनांच्या लिलाव प्रक्रीयेच्या विरोधात स्थगिती आणली होती आता न्यायालयाने स्थगिती उठविल्याने थकबाकीदारांना चांगलाच दणका बसला आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जवसुली करिता धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हा बँकेची सभासदांकडे वाहन, ट्रॅक्टर कर्जाची मोठी थकबाकी असून पेठ तालुक्यातील ३२ ट्रॅक्टर वाहन जप्त केलेले होते. बँकेने येत्या १६ एप्रिल रोजी या ट्रॅक्टर्सस्चा लिलाव करण्याची नोटीस बजावली होती. त्यास काही थकबाकीदारांनी हरकत घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी मिळालेली स्थगिती आता ठविण्यात आली आहे.