शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
2
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
3
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
4
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
5
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
6
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
8
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
9
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
10
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)
11
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
12
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
13
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
14
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
15
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
16
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
17
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
18
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
19
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
20
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा

ओबीसींचे आरक्षण टिकविण्यासाठी एकत्रित लढ्याची गरज : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 1:18 AM

धनगर समाजाची अनुसूचित जमातीतील आरक्षणाची मागणी असली तरी ज्या ओबीसी प्रवर्गातून धनगर समाजाला व्हीजेएनटीचे आरक्षण मिळले तेच आरक्षण जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सर्व घटकांनी मिळून ओबीसीतील आरक्षण वाचविण्यासाठी संघटित लढा देण्याची गरज असून, त्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित येण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ठळक मुद्देबांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा नागरी सत्कार

नाशिक : धनगर समाजाची अनुसूचित जमातीतील आरक्षणाची मागणी असली तरी ज्या ओबीसी प्रवर्गातून धनगर समाजाला व्हीजेएनटीचे आरक्षण मिळले तेच आरक्षण जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सर्व घटकांनी मिळून ओबीसीतील आरक्षण वाचविण्यासाठी संघटित लढा देण्याची गरज असून, त्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित येण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे पुण्यश्लोक फाउंडेशनतर्फे आयोजित हिंदुस्थानचा युगपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव २०२२ चे औचित्य साधत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा नागरी सत्कार पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, माजी आमदार हरीभाऊ भदे, संयोजन समितीचे धनंजय तानले, सहसंयोजक शिवाजीराव ढेपले, दत्तू बोडके, आदी उपस्थित होते. परंपरा रूढींच्या बंधने झुगारून सुभेदार मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई होळकर यांना सती जाण्यापासून रोखत राज्यकारभार त्यांच्याकडे सोपविला. त्यामुळे आज देशभरात अहिल्याबाई होळकर यांचे नाव पोहोचले असल्याचे नमूद करतानाच समाजातील महिलांनी त्यांचा आदर्श घेऊन आपली प्रगती साधण्याचे आवाहनही भुजबळ यांनी केले. समाजासाठी वेगवेगळ्या कामांना नियमांच्या चौकटी बसवून पुढे नेण्याची वेळ येत असली समाजहितासाठी तेही करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे सत्काराला उत्तर देताना दिले. तर धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या मेंढीपालन व्यवसाय शासनस्तरावर आर्थिक सहाय उपलब्ध करून देण्यासबोतच मेंढ्यांचा विमा, मेंढपाळांना संरक्षण कायदा अस्तित्वात आणण्यासह मेंढीपालन व्यवसायासाठी ठोस योजना आणण्याची मागणी माजी आमदार हरिभाऊ भदे यांनी केली. दरम्यान, महावितरण नाशिकचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर पडळकर, महापारेशनचे मुख्य कार्यकारी अभियंता विनोद ढोरे व पत्रकार संतोष बिरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

--

हिंदुस्थानचा युगपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर पुरस्कारार्थी

मुंबईचे विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे, ह.भ.प. तुकाराम महाराज जेउरकर, माजी उपजिल्हाधिकारी तथा साहित्यिक देविदास चौधरी, नगरसेवक पूनम मोगरे, नाशिक जिल्हा अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेंद्र दुकळे, उद्योजक बाळासाहेब मूरडनर, प्रगतिशील शेतकरी दत्तू देवकर, जनरल सर्जन डॉ. विजय थोरात, पत्रकार धनंजय वानले, क्रीडापटू विजय गाढे.

टॅग्स :NashikनाशिकOBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळ