पुरुषोत्तम राठोड -घोटी (जि. नाशिक) : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना ग्रेडर मशीन कोसळून झालेल्या अपघातानंतर गर्डरचा मोठ्या प्रमाणात ढिगारा खाली पडला. तो काढण्याचे काम सोमवारी मध्यरात्रीपासून युद्धपातळीवर सुरू होते. स्थानिक प्रत्यक्षदर्शीच्या मते ढिगाऱ्याखाली दबलेल्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे.
हाहाकार पाहून भावनिक झालो -रात्री एकनंतर मी घटनास्थळाकडे निघालो. पहाटे साडेचारच्या सुमारास घटनास्थळावर पोहोचल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात आली. समोरचे दृश्य अतिशय मन हेलावणारे होते. सर्वत्र हाहाकार माजला होता. घटनास्थळी तोपर्यंत रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक, पोलिस, एमएसआरडीएचे अधिकारी, सारी यंत्रणा कामाला लागली होती. क्रेन व पुलाच्या ढिगाऱ्याखाली किती लोक अडकले, याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अगोदर बचावकार्य हाती घेणे महत्त्वाचे होते. एकेक व्यक्तीला बाहेर काढले जात असताना त्यावेळी साधारणत: तेरा ते चौदा मृतदेह हाती लागले होते.- दादा भुसे, सार्वजनिक बांधकाममंत्री
१,२६० टनांचा महाकाय गर्डर -बॅलन्स कॅन्टीलिव्हर सेगमेंट लाँचिंग करणारी लिफ्ट ही अंदाजे दोन हजार टनांपेक्षा अधिक असते. ही लिफ्ट व ९० टनांचा एक ब्लॉग असे १४ ब्लॉग मिळून एक गर्डर तयार होते. या गर्डरचे वजन १,२६० टनांपेक्षा अधिक होते. या गर्डरला दोन पिलरवर चढवायचे असल्यास दोन हजार टनांची क्रेन वर लाँच करते. त्यासाठी सुमारे ३० ते ३५ कामगार लागतात. या लिफ्टिंगमध्ये बिघाड होऊन -अर्थात वजन न पेलवल्याने किंवा पावसात काम सुरू असल्याने जमीन खाली खचली असल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे.
नातेवाइकांचा रुग्णालयात आक्रोश- गाझीपूर उत्तर प्रदेश येथील परमेश्वर निषाद (वय २४) समृद्धीच्या कामासाठी क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत होता. - या अपघातात परमेश्वर मृत्युमुखी पडल्याने त्याचे दोन्ही भाऊ पंकज व प्रिन्स हे रुग्णालयात दाखल झाले असता त्यांच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. - लहान भाऊ गेल्याचे दु:ख अनावर झाल्याने ग्रामीण रुग्णालयातील वातावरण सुन्न झाले होते. परमेश्वर अविवाहित होता. लवकरच त्याचे लग्न करायचे होते. - प्रचंड मेहनती असलेला परमेश्वर उत्कृष्ट क्रेन ऑपरेटर होता. त्याच्या मेहनतीबद्दल सर्वच त्याचे कौतुक करीत असत. मृतांची नावे -१) अरविंदकुमार उपाध्याय (सुपरवायझर, वय ३३, रा. उ. प्र.)२) गणेश रॉय (कामगार, ४०, रा. पश्चिम बंगाल)३) लल्लन राजभर (कामगार, ३६, उ. प्र.)४) परमेश्वर खेदारूलाल यादव (विंच ऑपरेटर, २७, उ. प्र.)५) प्रदीपकुमार रॉय (हायड्रॉलिक टेक्निशियन, ४४, बंगाल)६) राजेश शर्मा (हायड्रॉलिक ऑपरेटर, ३२, उत्तराखंड)७) संतोष जैन (सीनियर गॅन्ट्री मॅनेजर, ३६, तमिळनाडू)८) राधेश्याम यादव (कामगार, ३९, उ. प्र.)९) आनंदकुमार यादव (कामगार, २७, उ. प्र.)१०) पप्पूकुमार कुलादेव साव (कामगार, ३४, बिहार)११) कानन वैदा रथीनम (पीटी इंजिनीअर, २३, तामिळनाडू)१२) सुब्रोत सरकार (कामगार, २४, पश्चिम बंगाल)१३) सुरेंद्रकुमार पासवान (कामगार, ३८, बिहार)१४) बाळाराम सरकार (सुपरवायझर, २८, प. बंगाल)१५) मनोजसिंह यादव (कामगार, ४९, बिहार)१६) नितीनसिंग विनोदसिंह (कामगार, २५, उ. प्र.)१७) लवकुश रामुदिन साव (कामगार, २८, बिहार)१८) सत्यप्रकाश पांडे (कामगार, ३०, बिहार)१९) रामाशंकर यादव (कामगार, ४६, उत्तर प्रदेश)२०) सरोजकुमार जगदीशकुमार (कामगार, १८, उत्तर प्रदेश)
जखमी -१) यू. किशोर (इलेक्ट्रिशियन) २) प्रेमप्रकाश (कामगार)३) चंद्रकांत वर्मा (कामगार)
बचावलेले -१) रिऑन कुमार (कामगार)२) पिताबस बिस्वाल (कामगार)३) उपेंद्र पंडित (मेथड इंजिनिअर)४) अभिजित दास (कर्मचारी)५) अन्बुसेल्वन के. (कर्मचारी)
पाऊस, चिखलाचा परिणामअपघातानंतर सुरुवातीला खासगी जीवरक्षक व सरलांबे येथील तरुण अपघातस्थळी मदत कार्यासाठी पोहोचले. त्यानंतर एनडीआरएफचे पथक दुर्घटनास्थळी दाखल झाले. पाऊस व चिखल यामुळे लोखंडी सांगाड्यात अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात अडथळा हाेत होता.