देवगाव : देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावरील ढोलेवाडीजवळ उतारावरील वळणावर गेल्या एक ते दीड महिन्यापासून एक भला मोठा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी पडला असून वाहनचालकांना या खड्ड्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना खड्डा चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तो खड्डा धोकादायक व जीवघेणा बनला आहे.खतरनाक ठरू पाहत असलेल्या खड्ड्यासंदर्भात प्रवाशांसह वाहनचालकांमधून खड्डा बुजवण्याची मागणी होऊ लागली आहे. परंतु, संबंधित विभागाने खड्डा बुजवण्यासाठी कोणतेच प्रयत्न न केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित विभागावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी ढोलेवाडीजवळ देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावर रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा पडला होता. परंतु, संबंधित प्रशासनाने या भगदाडाकडे दुर्लक्ष केल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे खड्ड्याचे रूपांतर भल्यामोठ्या खड्ड्यात झाले असून आता खड्ड्याने संपूर्ण रस्ताच व्यापून टाकण्याची संबंधित विभाग वाट बघत असल्याचा खोचक सवाल प्रवाशांमधून केला जात आहे.रस्त्यावरील खड्ड्यामुळे रात्री-अपरात्री वाहनधारकांना अंदाज न आल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ढोलेवाडीजवळून एका उतारावरील वळणावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी खड्ड्यातून वाटचाल करत असताना अनेकांना छोट्या-मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले आहे.रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज न आल्याने काही दुचाकीस्वार खड्ड्यात आदळून कोलमडल्याच्या घटना घडून जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वाहनधारकांकडून तो खड्डा बुजविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गक्रमण चालूसदर रस्ता नियमित वर्दळीचा असून या मार्गाने लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गक्रमण नियमितपणे चालू असते. तसेच मुंबई-नाशिककडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्यामुळे या रस्त्याने मोठी रीघ लागलेली असते. त्र्यंबकेश्वरकडे पायी जाणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन प्रवाशांसह वारकऱ्यांचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
ढोलेवाडीजवळील खड्डा ठरतोय जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 12:20 AM
देवगाव : देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावरील ढोलेवाडीजवळ उतारावरील वळणावर गेल्या एक ते दीड महिन्यापासून एक भला मोठा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी पडला असून वाहनचालकांना या खड्ड्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना खड्डा चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तो खड्डा धोकादायक व जीवघेणा बनला आहे.
ठळक मुद्देदेवगाव : खड्डा बुजवण्याची वाहनचालकांची मागणी