नाशिक : महाप्रचंड वेगाने पुणे महामार्गावरून नाशिकरोडच्या दिशेने जाणाऱ्या महामंडळाच्या शिवशाही बसची महावितरणच्या विद्युत खांबाला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की खांब अर्धवक्र कार खाली वाकला अन समोरून बस निम्म्याहून अधिक त्यावर चढली अन पुन्हा खाली घसरली. यामुळे अतिकच्च दाबाच्या विजवाहिन्या असलेले येथील दोन विद्युत खांब ओढले जाऊन जमिनीकडे झुकले. यावेळी बसने रिक्षालाही पाठीमागून धडक दिली. त्यामुळे चार प्रवाशी जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे या अपघातग्रस्त बसचे अक्सिलेटर चक्क एका दोरीने बांधलेले ब्रेकजवळ दगड ठेवलेले आढळून आले.
नाशिकहून पुण्याच्या दिशेने सुटलेली शिवशाही बस (एम एच०९ ई एम १२९७) भरधाव महामार्गावरून जात होती. दुपारच्या सुमारास नाशिक रोडजवळील पासपोर्ट कार्यालयासमोरील शिखरेवाडी चौकात बसचालकाचा ताबा अचानक सुटला आणि बस थेट विद्युत खांबाला धडकून त्यावर चढलीसुध्दा. सुदैवाने हा खांब याठिकाणी अडथळा ठरला अन्यथा बस पुढे थेट फटाक्यांच्या स्टॉलवर जाऊन आदळली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याठिकाणी रिक्षा थांबदेखील आहे. येथे उभ्या असलेल्या रिक्षाला (एम एच 15 एफ यु 8389) पाठीमागून काही प्रमाणात धडक बसली। ही रिक्षा विद्युत खांबाच्या पुढे काही फुटांवर उभी होती. रिक्षाचालक जखमी झाला आहे.
ऐन भाऊबीजेच्यादिवशी शिवशाही बसला अशाप्रकारे अपघात झाल्याने प्रवाशांची सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली. येथील स्पीडब्रेकर बस आली असता ब्रेक न लागल्याने चालकाने गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसची धडक खांबाला बसल्याचे काही नागरिकांनी सांगितले. काही जागरूक नागरिकांनी घटनास्थळावरून थेट फेसबुक लाइव्ह करत आरटीओ सह महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. घटनेची माहिती हातात उपनगर पोलीस या ठिकाणी दाखल झाले होते. तसेच महामंडळाच्या आगाराचे अधिकारीदेखील या ठिकाणी पोहोचले होते. सुदैवाने या विचित्र अपघातावेळी मोठी दुर्घटना टळल्याने नाशिककरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
....तर बसला आग लागली असती!
शिवशाही बस ही विद्युत कामाला जोरात धडकली या विद्युत कामावर अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्या होत्या या वीजतारा जर शिवशाही बस वर पडल्या असत्या किंवा टिकल्या असत्या तर कदाचित शॉर्टसर्किट होऊन बसला आग देखील लागण्याचे धोका होता, असे काही प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. यामुळे पंधरवड्यापूर्वी औरंगाबाद महामार्गावर तपोवन जवळ झालेल्या खाजगी लक्झरी बसच्या दुर्घटनेची पुनर्वृत्ति सुदैवाने तळल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला.