शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

तिघांना ऑनलाइन गंडा घालत तब्बल ११ लाख ४३ हजार रूपये लुटले

By दिनेश पाठक | Updated: February 2, 2024 19:21 IST

सोपे टास्क देत पाडले माेहजालात; नंतर झाली फसवणूक

नाशिक : सोपे टास्क देऊन गलेलठ्ठ पैसे कमविण्याचे आमिष देत २१ वर्षीय तरूणासह अन्य दाेन जणांना तब्बल ११ लाख ४३ हजार रुपयांत ऑनलाइन गंडा घालण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहजालात अडकलेल्या तरुणांनी सायबर पोलिस ठाणे गाठत फिर्याद नाेंदविली. आपल्या अकाऊंटमधील पैसे संपल्याने दाेघांनी तर चक्क ऑनलाइन पैसे उसनवार मागितले. परंतु तेही पैसे ते गमावून बसले. शहरातील तिघाही फिर्यादींना एकाच टोळीने वेगवेगळ्या नंबरवरून फसविल्याचे निष्पन्न झाले आहे. 

ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार रोजच घडत असल्याने सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. शिवम दयानंद सूर्यवंशी (२१) रा.ताज हेरीटेजजवळ, कृष्णाई नगर याने फिर्याद दाखल केली आहे. शिवम याच्यासह अंकिता राय व मिथुन दाते यांना मोबाइलवर टेक्स्ट तसेच इस्टाग्रामवर ऑनलाइन गेमिंगचा तसेच त्या माध्यमातून सोपे टास्क जिंकत लाखो रूपये कमवा असा मेसेज आला. त्याला फिर्यादी भुलले. त्यांनी मेसेजच्या लिंकवर क्लिक करताच साइट ओपन झाली. अन् त्यांना सुरुवातीस दोन सोपे टास्क देण्यात आले.

त्यात शिवम व अन्य दाेघेही जिंकले. त्या बदल्यात त्यांच्या बँक खात्यावर बक्षीस स्वरूपात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे नंतर तीन दिवस मोबाइल क्रमांक ८६०२७१०८८७ या व्हॉट्सॲपवर तसेच त्यांच्या टेलिग्रामवर तीन ठिकाणाहून वेळाेवेळी मेसेज आले. त्यात काही टास्क देण्यात आले. प्रिपेड, प्रीमियम टास्कचे नाव सांगत मग संशयित सायबर आरोपींनी दिलेल्या अकाऊंटवर पैसे भरण्यास सांगितले. डॅश बोर्डावर टास्क पूर्ण झाले की पैसे बक्षीस म्हणून मिळत असल्याचे या तिघांनाही दाखविण्यात आले, परंतु प्रत्यक्ष त्यांच्या अकाऊंटवर बक्षिसाचे पैसे पडतच नव्हते. पहिले फक्त दोन टास्क जिंकल्याचे पैसे पडले होते. ते पाहून फसवणूक झालेल्या तिघांनी एकएक टास्क जिंकण्यासाठी पैसे टाकले. पण जिंकल्याचे लाखे रूपये आपल्या अकाऊंटला जमाच झाले नाही. तर त्या बदल्यात आपणच पैसे देऊन बसलो असल्याचे लक्षात येताच तिघांनी सायबर पोलिस स्टेशन गाठले.

फसवणुकीचा आकडा असाअंकिता रॉय यांची ५ लाख १६ हजार, मिथुन अशोक दाते यांची ३ लाख २४ हजारात तर शिवम सूर्यवंशी याची ३ लाख तीन हजार रूपये अशी मिळून ११ लाख ४३ हजार रुपयांना फसवणूक झाली. मागील महिन्यात एकाची ९४ लाखात तर एकाची ४२ लाखात अशीच फसवणूक झाली होती. त्यानंतर ही सर्वात मोठी ऑनलाइन फसवणूक आहे. त्यामुळे कोणीही अनोळखी नंबरहून आलेल्या नंबरवरचे ऑनलाइन गेमिंग किंवा टास्कचे मेसेज ओपन करू नये, असे आवाहन सायबर क्राइम विभागाने केले आहे.