- राजू ठाकरे
नाशिक : ए डब्लू इव्हेंट आयोजित एम आर एफ मोग्रीप राष्ट्रीय दुचाकी स्पर्धेचा थरार आज सकाळी घोटी वैतरणा रोड वरील धरनोली या ठिकाणी अनुभवायला मिळाला. मोटर क्रीडाप्रेमींमध्ये जोश आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी सकाळी क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूण ५६ किलोमीटर्स अंतरामध्ये ही स्पर्धा संपन्न होत असून १४ किलोमीटर्सचे चार सरळ राउंड आहे. ही स्पर्धा एकूण १० विविध गटांमध्ये खेळवण्यात येत असून या वर्षी विक्रमी ८१ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत पाच महिलांचा देखील सहभाग असून यात स्कूटर्स तसेच विदेशी बनावटीच्या गाड्या सहभागी झाल्या आहेत.