नाशिक : बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील सात नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. गतवर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये या निवडणुका होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यावेळी या निवडणुका न घेता या पालिकांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत.
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी पूर्वतयारी सुरू केली होती. मात्र नंतर या निवडणुका पुढे गेल्याने इच्छुक नाराज झाले होते. मात्र आता तारखा घोषित झाल्यामुळे या इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून ते कामाला लागले आहेत.
इन्फो बॉक्स
सिन्नर प्रभाग : १५
सदस्य संख्या : ३०
मुदत संपली : डिसेंबर, २०२१
गतवेळचे सत्ताधारी : शिवसेना
---
मनमाड
प्रभाग : १६
सदस्य संख्या : ३३
मुदत संपली : डिसेंबर, २०२१
गतवेळचे सत्ताधारी : शिवसेना
------------
येवला
प्रभाग : १३
सदस्यसंख्या : २६
मुदत संपली : डिसेंबर, २०२१
गतवेळचे सत्ताधारी : भाजप (थेट नगराध्यक्ष)
राष्ट्रवादी काँग्रेस
-----------------
नांदगाव
प्रभाग : १०
सदस्यसंख्या : २०
मुदत संपली : डिसेंबर, २०२१
गतवेळचे सत्ताधारी : शिवसेना
-----------------
चांदवड
प्रभाग : १०
सदस्यसंख्या : २०
मुदत संपली : नोव्हेंबर, २०२१
गतवेळचे सत्ताधारी : भाजप नंतर काँग्रेस
-------------
सटाणा
प्रभाग : १२
सदस्यसंख्या : २४
मुदत संपली : डिसेंबर, २०२१
गतवेळचे सत्ताधारी : भाजप (शहर विकास आघाडी)
----------------
भगूर
प्रभाग : १०
सदस्य संख्या : २०
मुदत संपली : डिसेंबर, २०२१
गतवेळचे सत्ताधारी : शिवसेना