ठळक मुद्दे पिंपळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पिंपळगाव बसवंत : येथील निफाड फाट्यावर चंद्रभान रामकृष्ण संधान रा चिंचखेड ता. दिंडोरी येथील शेतकऱ्याने द्राक्षे व्यापाºयाकडुन मिळालेल्या चेकची रक्कम दुपारी चार वाजता युनियन बॅँकेतुन काढली १ लाख ९५ हजार रु पये आपल्या मोटरसायकलच्या डिकीत ठेवली व निफाड फाट्यावरील एका किराणा दुकानदाराचे ३५ हजार रु पये ऊधारी देत पुन्हा पैसे डिकीत ठेवत जवळच वस्तूची खरेदी करण्यासाठी गेले असता याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी डिकीतुन १ लाख ६० हजाराची रक्कम लंपास केली. या प्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.