कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी, दळवट आदी गावातील शेतकऱ्यांच्या एका रात्रीत पाच बैलांची चोरी झाल्याची घटना घडली. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून बैलचोरीची फिर्याद अभोणा पोलीस ठाणे मध्ये दाखल करण्यात आल आहे. कनाशी परिसरात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे पशुधन चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. या टोळीला जेरबंद करण्यात काही अंशी पोलिसांना यश आले होते. पंरतू या टोळीने पुन्हा डोके वर काढले असून टोळीला काबुत आणण्याचे मोठे आव्हान अभोणा पोलिसांसमोर उभे राहिले आहे .परिसरात रात्री अपरात्री उभ्या असणाऱ्या व गुराच्या गोठ्यामध्ये शिरून गाडीत कोंबून ही गुरे नेली जातात. यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन व दुभती जनावरे चोरीला जात असल्याने चिंतेचे सावट पसरले आहे . या गुरे चोरणाऱ्या टोळीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून रात्रीच्या सुमारास ५ ते ६ जणांचे हत्यारबंद टोळके शेतकऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देवून शेतकरीवर्गाच्या झेळयासमोर जनावरे चोरून नेत आहेत. आठ दिवसापूर्वीचं टोळीचा पोलिसांनी पाठलाग केल्याने गाडीमधून एक दुभती गाय वाहनातून पडळल्यामुळे कनाशी येथील रस्त्यावर मरून पडली होती. बैल व शेळी चोरणारी अनेक टोळया सक्रि य झाल्या असून सदर टोळ्याचा बंदोबस्त करण्याचे आवाहन अभोणा पोलीसांसमोर उभे आहे. सदरची बैलाच्या चोरीचा तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक रविंद्र देशमुख व कर्मचारीवर्ग करित आहे. (वार्ताहर)