नाशिक : मखमलाबादच्या प्री-प्रायमरी स्कूलसमोरील गणेश अपार्टमेंटमधून चोरीस गेलेली पल्सर दुचाकीचा शोध लावण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले असून, गुजरात राज्यातील बडोदरा येथून दुचाकीसह दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे़गणेश अपार्टमेंटच्या पार्किंगमधून सुमित कापसे यांची दुचाकी (एमएच १५, ईडब्ल्यू ००९४) २० ते २१ एप्रिलदरम्यान चोरीस गेली होती़ ही दुचाकी संशयित रवि विठ्ठल घोडके (२१, रा़ एरिकेशन कॉलनी, मखमलाबाद) व राजवाड्यातील एका विधीसंघर्षित बालकाने चोरून नेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांना मिळाली होती़ त्यांच्या मार्गदर्शनावरून पोलीस उपनिरीक्षक गिरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, पोलीस हवालदार संजय राऊत, सोमनाथ शार्दुल, वालझाडे विधाते यांनी ही कामगिरी पार पाडली़ तडीपार गुंडास अटकशहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ इंद्या वसंत बंदरे (२१, रा. सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, वडाळा) यास इंदिरानगर पोलिसांनी धारदार शस्त्रांसह अटक केली आहे़ पोलीस उपआयुक्तांनी ७ मार्च २०१५ रोजी त्यास दोन वर्षांसाठी तडीपार केले होते़; मात्र न्यायालय वा सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता इंद्याचा वडाळ्यातच मुक्त संचार होता़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
चोरीची दुचाकी गुजरातमधून जप्त
By admin | Published: May 10, 2016 10:38 PM