नाशिक : किराणा दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या ग्राहकाने गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना सातपूर परिसरात घडली़ अशोकनगर पोलीस चौकीसमोरील ब्लू डायमंड अपार्टमेंटमध्ये सरस्वती ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या संशयिताने दुकान मालकाचे लक्ष विचलित करून गल्ल्यातील ४७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
दुकानातून रोख रकमेची चोरी
By admin | Published: November 22, 2015 11:07 PM