नाशिक : नाशिकरोड येथील देवळालीगाव राजवाडा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवण्यात आलेले दोन लोखंडी बाक चोरट्यांनी रात्रीतून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. एका चारचाकी मालवाहू वाहनामधून चोरट्यांनी राजरोसपणे बाके उचलून नेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.प्रभाग क्रमांक २२ मधील राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर गेल्या काही महिन्यांपासून नगरसेवकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी राजवाड्याला पाच बाके दिली होती. परंतु प्रत्यक्षात तीनच बाके लावण्यात आली होती. उर्वरित दोन बाके तेव्हाच गायब करण्यात आली आहेत. वास्तविक राजवाडा, रमाबाई आंबेडकरनगर या भागात स्वच्छता आणि आरोग्याच्या बाबतीत तसेच पालिकेच्या सोयी-सुविधांबाबत लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने तसाही हा भाग वंचित असल्याची नागरिकांची तक्रार आहे. महापालिकेचे लोखंडी बाक एव्हढीच काय ती सुविधा देण्यात आली होती. परंतु आता त्यातीलही लोखंडी बाके चोरीस गेली आहेत. यापूर्वीदेखील सदर बाके उचलून नेण्याचा प्रकार घडला होता. परंतु त्यावेळी सामंजस्याने सदर बाके ठेवण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिकांना या बाकांचा उपयोगही होत आहे. परंतु आता तर बाके चोरीस गेल्याने सदर प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.-----------------------------मालधक्का मार्गाचे रुंदीकरण व्हावेराजवाड्याकडून मालधक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. राजवाड्याच्या एका बाजूने मोकळी जागा आहे, तर दुसºया बाजूला दाट लोकवस्ती. या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक लक्षात घेता मोकळ्या जागेतून या मार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी झाला आहे. त्यासाठीचे मार्किंगही करण्यात आलेले आहे. त्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. राजवाड्याच्या कोपºयावरील वळण रुंद करण्यासाठीदेखील अतिक्रमण हटविण्याची आवश्यकता आहे.
मनपाच्या लोखंडी बाकांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 10:05 PM