नाशिक : इंदिरानगर परिसरातील श्रद्धा विहार कॉलनी व पांडवनगरी भागातील विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या आणि अल्युमिनियमच्या पट्या भुरट्या चोरट्यांनीचोरून नेल्याने परिसरातील नागरिकांना मध्यरात्रीपासून सुमारे बारा तास अंधारात राहावे लागले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून परिसराती सार्वजनिक मालमतांची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.इंदिरानगरच्या श्रद्धा विहार कॉलनी परिसरात वेगवेगळ््या सोसाट्या आणि अपार्टमेंट या भागातील एका विद्युत रोहित्राच्या आणि पांडवनगरी परिसरातील दोन विद्युत रोहित्राच्या पट्यांची भुरट्या चोरट्यांनी सोमवारी (दि४) रोजी मध्यरात्रीच्या चोरी केली. त्यामुळे परिसरातील महावितरणच्या शंभरहून अधिक ग्राहकांना सुमारे बारा तास अंधारात काढावे लागले. गेल्या काही दिवसात या भागातील भुरट्या चोºयांमध्ये प्रचंड वाढ झाली असून परिसरातून विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या आणि अल्युमिनियमच्या पट्टयांच्या चोरीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अनेकदा परिसरातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याने या भागातील विद्युत रोहित्रासह सार्वजनिक मालमत्तांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांडून होत आहे. दरम्यान, विद्युत रोहित्रांच्या पट्याचोरणाºयांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नाशिकच्या इंदिरानगरमधील विद्युत रोहित्रांच्या पट्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 5:48 PM
विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या आणि अल्युमिनियमच्या पट्या भुरट्या चोरट्यांनी चोरून नेल्याने इंदिरानगर परिसरातील श्रद्धा विहार कॉलनी व पांडवनगरी भागातील परिसरातील नागरिकांना मध्यरात्रीपासून सुमारे बारा तास अंधारात राहावे लागले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून परिसराती सार्वजनिक मालमतांची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.
ठळक मुद्देविद्युत रोहित्रांवर भूरट्या चोरट्यांची वक्रदृष्टी इंदिरानगरमध्ये तांबे, अल्युमिनियमच्या पट्या चोरी