येवला : तालुक्यातील खिर्डीसाठे येथून तलावात लावलेली पाणबुडी केबलसह चोरीस गेली आहे. खिर्डीसाठे येथील तलावातून शेतकरी मनोज शिवाजी साबळे यांच्या मालकीची पाच अश्वशक्ती क्षमतेची पाणबुडी आणि ५० फूट लांब केबल असा एकूण ११ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. साबळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक पल्लाळ हे करत आहे.
खिर्डीसाठे येथून केबलसह पाणबुडी चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 01:33 IST