------------------
शिष्यवृत्ती परीक्षेत बारागावपिंप्री विद्यालयाचे यश
सिन्नर : तालुक्यातील बारागावपिंप्री येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी विद्यालयाचे ५० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. आदित्य उगले जिल्ह्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर तेजस पानसरे जिल्ह्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य अशोक बागूल, उपप्राचार्य उदय देवनपल्ली, पर्यवेक्षक दशरथ जारस, भाऊराव गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
----------------------
सिन्नरला भाजपाचे निषेधाचे निवेदन
सिन्नर : भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून आघाडी सरकारचे धाबे दणाणले आहेत. त्यांचा जळफळाट होत असून सुडापोटी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असल्याचा आरोप करीत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या या कृत्याचा निषेध केला. याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, सुभाष कर्पे, रामनाथ डावरे, जयंत आव्हाड, महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे, रुपाली काळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------
शिष्यवृत्ती परीक्षेत पांगरी शाळेचे यश
सिन्नर: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री संत हरिबाबा विद्यालयाचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. संकेत संजय पगार, स्वप्निल राजेंद्र पगार, स्वप्निल शिंदे, महेश पांगारकर, अंजली गोसावी या पाच विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या यशाबद्दल विद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक डी. बी. गोेसावी, विभागप्रमुख एम.पी. अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.
-------------------
पीक विमा सुविधा केंद्राचे उद्घाटन
सिन्नर : भारती एनसा कंपनीचे प्रधानमंत्री पीक विमा योजना सुविधा केंद्राचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी आण्णासाहेब गागरे, कृषी मंडळ अधिकारी वेठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी संजय पाटील, कोते, कृषी सांख्यिकी डेंगळे, कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी राहुल सानांसे, तालुका पीक विमा समन्वयक सुयोग वाजे, फळपीक विमा तालुका प्रतिनिधी अरुण पाचोरे, कृषी सहायक जोशी, दातिर, धनंजय तुंगार आदी उपस्थित होते.
---------------------
वंजारी फाउंडेशनतर्फे मुलांना खाद्यपदार्थ
सिन्नर : येथील वंजारी समाज फाउंडेशनच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील बेळगाव तऱ्हाळे येथील जिल्हा परिषद शाळेमधील आदिवासी समाजातील मुलांना पोषक खाद्य पदार्थाचे वाटप करण्यात आले. वंजारी समाज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे यांच्या सूचनेनुसार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रंगनाथ दरगुडे यांच्या मार्गदर्शनानुसार उपक्रम राबविण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन आव्हाड, विनायक आव्हाड, आशुतोष आव्हाड, भरत आव्हाड, महेश आव्हाड, अंकुश जमधडे, विशाल वारुंगसे उपस्थित होते.