ब्राह्मणगाव : येथे रविवारी रात्री गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक शिरसाठ यांचे घरासमोरील होंडा कंपनीची मोटरसायकल रू॥41्नस्र-9948 मूळ मालक बाळू बाजीराव अहिरे यांनी मोटरसायकल दारासमोरून चोरीस गेल्याचे सर्वत्र घबराट पसरली आहे. चोरीचे हे सत्र सुरूच असून या आधी झालेल्या चोऱ्यांचा अद्याप तपास लागला नाही, तोच चोरट्यांनी मोटरसायकल लंपास केल्याने गावात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत ही मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामपंचायतीने या बाबत त्वरित कार्यवाही करावी व पोलीस खात्यानेही या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वाढली आहे.एक दीड महिन्यापूर्वी येथील बसस्थानकाजवळील हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारमान्य देशी दारू दुकानातील वेगवेगळ्या प्रकारातील दारुची २७ खोकी चोरट्यांनी लांबविली. तेथऊन जवळच असलेल्या आदर्श आॅटो केअरचे कुलुप तोडून दुकानातील एक-एक लिटरचे सर्वो कंपनी आॅइलचे डबे, नवे दुचाकीचे टायर, गल्ल्यातील रोख रक्कम रु पये असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. शिवाय जावातील जुनी चंदनाची अनेक झाडेही चोरीस गेली आहेत.गावात अशोक जगताप, केवळ अहिरे, समाधान अहिरे, यांच्या शेळ्यांही चोरट्यांनी लांबविल्या त्यांचाही अद्याप तपास लागलेला नाही.त्या आधी जिभाऊ खरे, प्रताप शिरोडे यांच्याकडे झालेल्या घरफशेठ्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. सुनील परदेशी यांच्या दुकानाबाहेर अनेक जुन्या सायकली देखिल चोरटयांनी चोरून नेल्या. या व्यतिरीक्तअनेक ठिकाणी पेट्रोल, आरसे व गाठ्यांचे मानोग्राम चोरून नेतात. अशा दिवसेंदिवस चोरीचे घटना घडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ब्राह्मणगाव येथे चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 7:48 PM
ब्राह्मणगाव : येथे रविवारी रात्री गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक शिरसाठ यांचे घरासमोरील होंडा कंपनीची मोटरसायकल रू॥41्नस्र-9948 मूळ मालक बाळू बाजीराव अहिरे यांनी मोटरसायकल दारासमोरून चोरीस गेल्याचे सर्वत्र घबराट पसरली आहे. चोरीचे हे सत्र सुरूच असून या आधी झालेल्या चोऱ्यांचा अद्याप तपास लागला नाही, तोच चोरट्यांनी मोटरसायकल लंपास केल्याने गावात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत ही मागणी जोर धरू लागली आहे.
ठळक मुद्देदिवसेंदिवस चोरीचे घटना घडत असल्याने नागरिक भयभीत