नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकामागून एक दुचाकी चोरीच्या घटना समोर येत असून गुरुवारी (दि. १३) एकाच दिवशी तीन दुचारी चोरीच्या घटनांचे गुन्हे अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. विशेष म्हणजे शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असताना ठिकठिकाकाणी नाकाबंदी आणि चेकपोस्ट तयार केलेल्या असतनाही दुचाकीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे शहकातील सुरक्षा व्यववस्थेकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना लिअर कंपनीच्या परीसरात घडली. या ठिकाणाहून उमेश मुलरीधर पाटील (२५, रा, सावतानगर, सिडको)यांची ४५ हजार रुपये किंमचीची दुचाकी क्रमांक एमएच १५ सीएफ ७५४७ चोरीला गेली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दुसरी घटना अंबड औद्योगिक वसाहतीतच घडली असून उन्नती इंजिनियरिंग कंपनीच्या पार्किंगमधून ३५ हजार रुपये किमचीची दुचाकी एमएच १५ बीसी ५५७१ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असून या प्रकरणात उन्निकृष्णन माणिकेन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिसऱ्या घटनेत गरवारे पॉईंट येथील रस्त्याचे बाजूस उभी केलेली ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी एमएच १५ डीएच ६० ३१ चोरीला गेली असून याप्रकरणी किसन जावनसिंग पाटील (३९) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.