नाशिक : शहरातील घरफोड्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अंबड व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत. या घरफोड्यांच्या दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सिडकोतील औदुंबर बसस्टॉपजवळील माऊल प्रभात कॉलनीतील रहिवासी निर्मला बाबूराव गायकवाड (६०) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरफोडी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करणाºया चोरट्यांनी २९ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ आणि ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार भड या प्रकरणीचा तपास करीत आहेत. तर नाशिकरोडच्या जयभवानी रोड लवटेनगर भागात हरिवैभव रो-हाऊसमधील संतोष बहादूर आमटे (३७) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. चोरीच्या उद्देशाने घरात घुसरेल्या चोरट्यांनी एक लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिन्यांची चोरी करून पोबारा केला. या प्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार एन. व्ही. कुंदे अधिक तपास करीत आहेत
नाशकात घरफोडीच्या घटनांमध्ये दोन लाखांचा ऐवज चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 6:47 PM
नाशिक शहरातील घरफोड्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अंबड व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत. या घरफोड्यांच्या दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
ठळक मुद्देनाशिक शहरात घरफोडीचे सत्र सुरुच अंबड, उपनगरमध्ये घरफोडीच्या घटना