सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी एकत्र येत चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्सक यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, खंडाळवाडी येथील अरुण माळी यांच्या मृत्यूबाबत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा दोष नसतांना व या प्रकरणी गठीत केलेल्या चौकशी समितीने चौकशी करूनदेखील चांदवड रुग्णालयातील डॉक्टरांबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. डॉ. सुशीलकुमार शिंदे दोषी नसतांना कारवाई झाल्यास सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सर्व अधिकारी सामूहिक राजीनामा देतील, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर डॉ. हेमराज डाके, डॉ. रमाकांत सोनवणे, डॉ. दीपक राजपुत, डॉ.फैजल , डॉ.शशिकांत देवढे, डॉ. सुजाता केदार, डॉ. जीवन देशमुख, डॉ. महेश परदेशी, डॉ. स्वप्नील वाळुंज, डॉ. पूजा शिंदे, डॉ.नीलेश गायकवाड, शरद चव्हाण, धनंजय पाटील, घनश्याम आंबेकर, सारिका दाणी, श्रीकांत तावडे, ज्ञानेश्वर विसावे आदींच्या सह्या आहेत.
इन्फो
आश्वासनानंतर उपोषण मागे
अरुण माळी यांच्या मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांचे निलंबन करावे तसेच माळी यांच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी तसेच इंदिरा आवास योजना किंवा राजीव गांधी योजनेच्या माध्यमातून घरकूल मिळावे या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान साळवे व अशोक हिरे यांनी उपोषण सुरू केले होते. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील आहेर यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
फोटो- २१ चांदवड डॉक्टर
प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना निवेदन देताना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी.
फोटो- २१ चांदवड उपोषण
चंद्रभान साळवे व अशोक हिरे यांचे उपोषण ज्यूस देऊन सोडवतांना सुनील आहेर, सचिन शिंदे.
===Photopath===
210521\21nsk_28_21052021_13.jpg~210521\21nsk_29_21052021_13.jpg
===Caption===
फोटो- २१ चांदवड डॉक्टर प्रांताधिकारी चंद्रशे~फोटो- २१ चांदवड उपोषण चंद्रभान साळवे व अशोक हिरे यांचे उपोषण ज्युस देऊन सोडवतांना सुनील आहेर, सचिन शिंदे.