दिंडोरी : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावेत अन्यथा मंगळवारी (दि.१५) महाराष्ट्रव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात येऊन कोविड -१९ विषयक कामावर बहिष्कार टाकण्यात येईल, असे निवेदन महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक)च्या वतीने दिंडोरी पंचायत समिती गट विकास अधिकारी व आरोग्य विभागाला निवेदन देण्यात आले.मार्च २०२१ पासून ग्रामीण व शहरी भागात आशा व गटप्रवर्तकांची प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र व क्वारंटाइन कॅम्प येथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ८ तासांची ड्युटी लावण्यात आली आहे. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन आशा सेविकांना कोरोना संशयित व्यक्तीची ॲन्टिजन टेस्ट करावी लागते. दैनंदिन लसीकरणाच्या आढाव्यापासून शासनाच्या सर्व योजनांचा तसेच आशा सेविकांनी केलेल्या सर्व्हेच्या कामाचा दैनंदिन आढावा गटप्रवर्तकांना वरिष्ठांना सादर करावा लागतो. २० ग्रामीण भेटी देण्याचे गटप्रवर्तकांचे मूळ काम आहे; परंतु त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र व क्वारंटाइन कॅम्पमध्ये ८ ते ९ तास काम करावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार व्हावा अन्यथा संप पुकारण्यात येईल, असा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले, तालुकाध्यक्ष माया घोलप यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तालुकाध्यक्ष सुनीता कुलकर्णी, अलका भोई, आशा गांगुर्डे, अलका वाटाणे, मनीषा देशमुख आदी उपस्थित होते.आशा कर्मचाऱ्यांवर कामाचा भारराज्यात कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करून सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या कामासाठी आशा स्वयंसेविकांचा व गटप्रवर्तकांचा सक्तीने समावेश करण्यात आला आहे. त्यात आशा कर्मचाऱ्यांवर घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या करून सर्व्हे करणे, त्यांचे रेकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीकरण अंतर्गत कॅम्पमध्ये हजर राहून कामे करणे आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
...तर आशा कर्मचाऱ्यांचा कामावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:01 PM
दिंडोरी : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावेत अन्यथा मंगळवारी (दि.१५) महाराष्ट्रव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात येऊन कोविड -१९ विषयक कामावर बहिष्कार टाकण्यात येईल, असे निवेदन महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक)च्या वतीने दिंडोरी पंचायत समिती गट विकास अधिकारी व आरोग्य विभागाला निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देइशारा : दिंडोरीत आरोग्य विभागाला निवेदन सादर