शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

...तर आधी करा गोदासेवा

By admin | Published: February 06, 2017 12:24 AM

संवर्धन चळवळ : सोळा कुंडांसह जलस्त्रोत उघडा; नदी पुनर्प्रवाहित करा

नाशिक : माघ शुद्ध दशमी ही तिथी गोदावरी प्रगट दिन म्हणून मानली जाते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कलावंत व गोदाप्रेमींनी ‘हवा असेल मतांचा मेवा तर आधी करा गोदासेवा’ असा नारा बुलंद केला आहे. गोदावरी बारमाही प्रवाहित राहण्यासाठी उपाययोजना करा आणि गोदावरीचा विकास घडवा, ही चळवळ गोदाप्रेमींनी हाती घेतली आहे.  राजकीय तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे गोदावरीच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आले आहे. यामुळे गोदावरीच्या पात्रात गटारीचे पाणी वाहत असल्याचे विदारक दृश्य नाशिककरांना बघावे लागत आहे. गेल्या वर्षीदेखील गोदावरीचे पात्र संपूर्णपणे कोरडेठाक झाल्याचे भयावह चित्र नाशिककरांनी पाहिले होते.  पावसाळ्यानंतर पुन्हा गोदापात्रामधील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली आहे. ठिकठिकाणी कचरा साचला असून, गोदा प्रदूषित झाल्याचे चित्र आहे. रामकुंडापासून तर तपोवनापर्यंत फेरफटका मारला असता गोदापात्रातील पाण्याला दुर्गंधी येते. एकूणच गोदावरी शुद्धीकरण व नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत टिकवावे. कॉँक्रिटीकरणामुळे गोदापात्रातील ऐतिहासिक सोळा कुंड व जिवंत जलस्त्रोत बंद झाले आहेत. महापालिका प्रशासनाने गोदावरीच्या उपनद्या अरुणा व वरुणा (वाघाडी) यादेखील अबाधित ठेवलेल्या नाहीत, असे गोदाप्रेमींचे म्हणणे आहे.