तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी संदर्भात उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार राहुल कोताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मास्क न वापरणे किंवा मास्क असूनही त्याचा व्यवस्थित वापर न करणाऱ्यांवर सिन्नर शहरासह ग्रामीण भागातही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश गायकवाड यांनी दिले. ग्रामीण भागात प्रति ग्रामपंचायत प्रतिदिन १० व्यक्ती याप्रमाणे दंडात्मक कारवाईचे उद्दिष्ट देण्यात आले. त्याचप्रमाणे सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यापूर्वी संबंधित पोलीस स्टेशन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास साथरोग अधिनियम आणि तत्सम कारवाई करण्याच्या सूचना पोलीस स्टेशन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या. हॉल, लॉन्स, मंगल कार्यालय अशा ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कुठल्याही समारंभास मर्यादेपेक्षा अधिक उपस्थिती असल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही यावेळी दिले.
इन्फो
एका बाजूनेच भरणार भाजी बाजार
शहरातील सरदवाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूने भरणाऱ्या भाजीपाला बाजारामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा मोठ्या प्रमाणात धोका असून सदर बाजार एका बाजूनेच भरवावा अशी मागणी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी तहसीलदारांकडे केली होती. त्यास अटकाव घालण्यासाठी येथील भाजीपाला बाजार एक दिवस डाव्याबाजूने तर दुसऱ्या दिवशी उजव्या बाजूने असा आलटून-पालटून भरवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
फोटो - २५ सिन्नर मंगल कार्यालय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड. समवेत तहसीलदार राहुल कोताडे आदी.
===Photopath===
250221\25nsk_26_25022021_13.jpg
===Caption===
फोटो - २५ सिन्नर मंगल कार्यालय कोरोनाच्या पाश्व'भूमीवर करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड. समवेत तहसीलदार राहुल कोताडे आदी.