शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

...तर ग्रामीण भागात कारखान्यांवर गंडांतर

By admin | Published: December 16, 2015 12:22 AM

निमाचा आक्षेप : ग्रामपंचायत अधिनियमात केल्या सूचना

नाशिक : प्रस्तावित ग्रामपंचायत अधिनियमाच्या प्रारूपात ग्रामीण भागात कराचा दर आकारताना प्रचलित बाजारभावाची किंमत विचारात घेण्यात आली असून, त्यामुळे सध्या ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या कारखान्यांना सध्याच्या दरापेक्षा बारा टक्के दरवाढ सोसावी लागणार आहे. असे झाल्यास ग्रामीण भागातील उद्योग बंद करण्याची वेळ येईल, अशी भीती निमाच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.शासनाच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांच्या सुधारित मसुद्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले. त्यात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. कराच्या दर निश्चितीवर त्यात आक्षेप घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रामध्ये कर आकारणी ही प्रतिचौरस फूट दराने होत असताना प्रस्तावित दरवाढ ही सध्याच्या दरवाढीपेक्षा १२ पट जास्त आहे. तसे झाल्यास उद्योजकांना कारखाने बंद करण्याची वेळ येईल. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची हाक दिली असताना त्याला छेद देणारी कर पद्धती असणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. उद्योजक प्रतिनिधींना विश्वासात न घेता सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी निमाचे अध्यक्ष राजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर, निमा पायाभूत समितीचे अध्यक्ष मनीष रावल, व्हिनस वाणी, आशिष नहार, अरुण चव्हाणके, मिलिंद वैद्य आदिंनी निवेदन देताना केली. (प्रतिनिधी)