लोहोणेर : कोरोनाने सध्या खेडोपाडी हाहाकार माजवला आहे. ठेंगोडा गावांत देखील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. आहे. येथे आरोग्यवर्धिनी केंद्र असून येथे एक ह्यआरोग्य अधिकारीह्ण पद देखील मंजूर आहे. परंतु गेल्या वर्षभरापासुन कोरोना कालावधीत देखील हे पद अद्याप ही रिक्त आहे. सद्यस्थितीत तेथे फक्त आरोग्यसेवक व आरोग्यसेविका हे दोन कर्मचारी काम बघत आहेत. त्यांच्याकडुन आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे.सध्या शासनाकडून कोरोनाची लसीकरण मोहीम जोरदारपणे सुरू आहे. आरोग्याची विविध तपासणी होत असतांना येथे आरोग्य अधिकारी असणे महत्त्वाचे आहे. परंतु वर्षभरापूर्वी देखील याबाबत ग्रामस्थांनी मागणी केली होती, पण येथे आरोग्य अधिकारी अद्याप मिळालेले नाहीत.गत वर्षापेक्षा यंदा कोरोनाचा चांगलाच कहर वाढला आहे. कोरोना बाधितांना लोहोणेर येथील आरोग्य केंद्रात जावे लागते. परंतु तेथेही कोरोना लस घेण्यासाठी बऱ्याच तांत्रिक अडचण येत असल्याने ठेंगोडा येथील ग्रामस्थ निरपुर येथे जातात. हे अंतर जवळपास वीस किलोमीटर आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी गैरसोईचे आहे. त्यामुळे लोकांना तेथे जाताना आर्थिक भुर्दंड बसत आहे.यामुळे ठेंगोडा गावातील नागरिकांनी येथे स्वतंत्र आरोग्य अधिकारी नेमणुक करावा व येथेच कोरोना लसीकरण करावे व तसेच कोरोनाची अँटीजेन तपासणी येथूनच करावी, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे नागरिकांनी केली आहे.ठेंगोडा आरोग्यवर्धिनी केंद्रात ह्यआरोग्यअधिकारीह्ण यांची नेमणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांना निवेदने दिली आहेत. कोरोनाचा काळ असल्याने तात्काळ आरोग्य अधिकारी मिळावा. अन्यथा ग्रामस्थ कुलुप लावतील.- नारायण निकम, उपसरपंच, ठेंगोडा.ठेंगोडा आरोग्यवर्धिनी केंद्रात आरोग्यअधिकारी नेमणुकीसाठी वरिष्ठ पातळीवर कळविण्यात आले आहे. यावर लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.- डॉ. हेमंत अहिरराव, तालुका वैद्यकीय अधिकारी(१५लोहोणेर) ठेंगोडा येथील आरोग्यवर्धिनी केंद्र.
ठेंगोडयाला आरोग्याधिकाऱ्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 12:41 AM
लोहोणेर : कोरोनाने सध्या खेडोपाडी हाहाकार माजवला आहे. ठेंगोडा गावांत देखील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. आहे. येथे आरोग्यवर्धिनी केंद्र असून येथे एक ह्यआरोग्य अधिकारीह्ण पद देखील मंजूर आहे. परंतु गेल्या वर्षभरापासुन कोरोना कालावधीत देखील हे पद अद्याप ही रिक्त आहे. सद्यस्थितीत तेथे फक्त आरोग्यसेवक व आरोग्यसेविका हे दोन कर्मचारी काम बघत आहेत. त्यांच्याकडुन आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे.
ठळक मुद्देआरोग्यवर्धिनी केंद्र : अपुऱ्या मनुष्यबळामुळे गैरसोय