पाटोदा : विज बिल भरण्यास टाळाटाळ ,आॅनलाईनची सर्व कामे ठप्पपाटोदा :थकीत विज बिलापोटी येथील बीएसएनएल उपकेंद्राचा विज पुरवठा खंडीत करून तेरा दिवसांचा कालावधी लोटला तरी बीएसएनएलकडून थकीत विज बिल भरण्यास प्रयत्न न होता टाळाटाळ केली जात असल्याने पाटोदा उपकेंद्रांतर्गत असलेले परिसरातील सुमारे पाच हजारपेक्षा जास्त मोबाईल स्वीच आॅफ आहेत. त्यामुळे सर्वत्र संपर्क तुटला असल्याने जनजीवन कोलमडून पडले आहे सेवा बंद असल्यामुळे पाटोदा परीसारतील लाखो रु पयांची उलाढाल गेल्या तेरा दिवसांपासून ठप्प झाली आहे.येथील विज वितरण कंपनीकडून येथील उपकेंद्रास विज पुरवठा केला जात आहे मात्र बीएसएनएलने गेल्या सहा महिन्यांपासून या केंद्राचे बिजबील न भरल्यामुळे व विज बिल भरण्यासाठी वारंवार सूचना देऊनही वरिष्ठ कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे विज वितरण कंपनीने कारवाईची बडगा उचलत गेल्या तेरा दिवसांपासून या कार्यालयाचा विज पुरवठा खंडीत केला आहे.तेव्हापासून या केंद्रांतर्गत असलेले सुमारे पाचहजारापेक्षा जास्त ग्राहकांचे मोबाईल तसेच शेकडो लॉडलाईन फोन बंद असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.त्याचप्रमाणे कनेक्टीव्हिटी नसल्याने सर्वच आॅनलाईन कामे ठप्प झाली आहेत.त्यामुळे ग्राहकांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना आपली कामे करण्यासाठी येवला या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे तेथेही एका चकारात कामे होत नसल्याने वेळ व पैशाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या कारभाराला ग्राहक वैतागले आहेत याबाबत विज वितरण कंपनी व बीएसएनएल यांनी तोडगा काढावा व सेवा सुरळीत करावी अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.