नाशिक : जिल्हा व तालुका न्यायालयात येत्या शनिवारी (दि़८) राष्ट्रीय लोकअदालत होणार असून, यामध्ये ६६ हजार ४०० प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़ एम़ बुक्के यांनी दिली़राष्ट्रीय लोकअदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे हे सामोपचाराने मिटावीत यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे हे प्रयत्नशील आहेत. या लोकअदालतीत जिल्ह्यातील विविध न्यायालयांत दाखल प्रकरणांपैकी ६ हजार ४०० प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये ३ हजार २०० फौजदारी प्रकरणे, ७५० चलनक्षम पत्रकांचा कायदा कलम १३८ करणे, ८० बॅँकेचे दावे, ३८० मोटार अपघात, २४८ कौटुंबिक वाद , ७८० दिवाणी व इतर प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. यापैकी १ हजार ९०० प्रकरणे नाशिक जिल्हा न्यायालयातील असून त्यामध्ये ८२० फौजदारी, ३२० चलनक्षम पत्रकांचा कायदा, २० बॅँकेचे दावे, २०० मोटार अपघात प्रकरणे, १८ कौटुंबिक वाद, २४५ दिवाणी प्रकरणे आहेत.पक्षकारांनी फायदा घेण्याचे आवाहनराष्ट्रीय लोकअदालतीत दावा दाखलपूर्व ६० हजार प्रकरणे ठेवण्यात आली असून त्यामध्ये जिल्हा न्यायालयातील २२ हजार प्रकरणांचा समावेश आहे़ लोकअदालतीत निकाली निघणाऱ्या प्रकरणात अपील नसते तसेच निकालही त्वरित लागतो़ दोन्ही पक्षांच्या सामोपचाराने दावे निकाली निघत असल्याने दोघांनाही समाधान तर मिळतेच शिवाय कोर्ट फी ची रक्कमही परत मिळते. त्यामुळे या लोकअदालतीचा पक्षकारांनी फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़
लोकअदालतीत ६६ हजार प्रकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 1:23 AM
जिल्हा व तालुका न्यायालयात येत्या शनिवारी (दि़८) राष्ट्रीय लोकअदालत होणार असून, यामध्ये ६६ हजार ४०० प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़ एम़ बुक्के यांनी दिली़
ठळक मुद्देआज सुनावणी : जिल्हा,तालुका न्यायालय