रत्नागिरी : दहा वर्षांपासूनची जिल्हा परिषदेच्या १३० प्राथमिक शिक्षकांची गटस्तरावरील विविध विषयांची २२ लाख रुपयांची देयके अजूनही थकीत आहेत. ही देयके मिळावीत, यासाठी शिक्षक, विस्तार अधिकारी परिषद भवनाचे उंबरठे झिजवत आहेत. आपल्याकडून शासन घरपट्टी, पाणीपट्टी व अन्य प्रकारचे कर थकीत राहिल्यास अनेकदा लेखी सूचना काढून ते भरण्याचे आदेश दिले जातात. त्यासाठी जप्तीसारखी कार्यवाही करण्यात येते. मात्र, शासनाकडून एक रुपयापासून लाखो रुपयांपर्यंत येणे असलेल्या पैशांसाठी दहा-दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागते. तरीही शासनाकडून येणारी देयके वेळेवर मिळत नाहीत.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक, उपशिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांची मागील दहा वर्षांपासूनची देयके त्यांना मिळालेली नाहीत. यामध्ये स्वग्राम, प्रशिक्षण, वैद्यकीय देयक, चटोपाध्याय वेतनश्रेणी, पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील फरक, प्रवास भत्ते, प्रशासकीय बदली, वेतन निश्चिती फरक, वाहन भत्ता आदी देयकांचा यामध्ये समावेश आहे. ही देयके अदा करण्यास केवळ शिक्षण विभागच जबाबदार आहे असे नाही, तर अनेकदा शिक्षकांकडून देयके वेळेवर जमा केली जात नाहीत. त्यासाठी शासनाकडून अनुदान वेळेवर येईल, असेही नाही. तसेच शिक्षण विभागाकडेही अनुदान शिल्लक नसल्याने शिक्षण विभाग ते कुठून देणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र. ही देयके मिळवताना अनेक शिक्षक निवृत्तही झाले. तरीही त्यांना देयके मिळालेली नाहीत. गेली अनेक वर्षे उंबरठे झिजवूनही न मिळाल्याने ते हताश झाले आहेत. (शहर वार्ताहर)प्राथमिक शिक्षकांची बिले शिक्षण विभागामध्ये दहा-बारा वर्षे पडून राहिल्याने अनेक शिक्षक हताश झाले आहेत. देयके देण्यासाठी आवश्यक असलेले अनुदान मिळण्यास शासनाकडून विलंब होतो. तसेच अपुरी तरतूद आणि देयके वेळेत न दिल्याने शिक्षकांची ही देयके थकली आहेत.जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्षण विभागाने थकीत असलेली देयके खर्ची घालण्यासाठी सादर केली होती. या सभेत २२ लाख ९४९ रुपये देयकांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ही देयके लवकरच शिक्षकांना मिळण्याची आशा निर्माण झाली असून, समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिकमध्ये आज एकाच दिवशी लागणार आठ लाख झाडे
By admin | Published: July 01, 2015 12:33 AM