शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

नोटांबाबत अशा आहेत मार्गदर्शक सूचना

By admin | Published: November 10, 2016 11:59 PM

नोटांबाबत अशा आहेत मार्गदर्शक सूचना

नाशिक : शासनाने हजार व पाचशेच्या नोटा चलनातून हद्दपार केल्यानंतर त्यासंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.  जुन्या चलनातील नोटा या खातेदारास त्याच्या बॅँक खात्यामध्ये किंवा रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया यांच्याकडे ३० डिसेंबरपर्यंत जमा करता येऊ शकतील. रुपये चार हजारपर्यंतची जुन्या चलनातील रक्कम विनंती अर्जाच्या स्लीपसह व ओळखपत्र जोडून बॅँकेत किंवा रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाकडे जमा करता येऊ शकतील. ही सुविधा सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. चार हजार रुपयांची मर्यादा वाढविण्याचा निर्णय येत्या पंधरा दिवसांत आढावा घेऊन घेतला जाईल. ज्या बॅँक शाखेत व्यक्तीचे खाते आहे त्या बॅँक शाखेच्या खात्यामध्ये स्वत: रक्कम जमा करण्यास बॅँक खातेदारास उच्चतम रकमेची मर्यादा नाही, तथापि ज्या प्रकरणांमध्ये खातेदाराचे केवायसी झालेले नाही अशा परिस्थितीत पन्नास हजार इतक्या मर्यादेतच जुन्या चलनाच्या नोटा जमा करता येतील. त्रयस्त व्यक्तीच्या बॅँक खात्यावर जुन्या चलनातील नोटा जमा करायच्या असल्यास अशा परिस्थितीत मूळ खातेदाराचे अधिकृत पत्र, ओळखपत्र जोडून अशी रक्कम जमा करता येऊ शकेल. बॅँक खातेदारास २४ नोव्हेंबर रोजी संपणाऱ्या पंधरवड्यापर्यंत दहा हजार रुपये एका वेळी परंतु वीस हजार रुपये प्रति आठवड्याच्या मर्यादेत रोख रक्कम बॅँकेतून उचल करता येईल. दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोगात असलेली नॉन कॅश व्यवहारावर कोणतेही निर्बंध नाहीत. म्हणजेच धनादेश, धनाकर्ष, क्रेडिट, डेबिट कार्ड, मोबाइल व्हॅलेट्स आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेले व्यवहार सुरळीत राहतील.  दि. १८ नोव्हेंबरपर्यंत खातेदारास त्याच्या एटीएममधून प्रति दिवशी दोन हजार रुपये प्रति कार्ड यानुसार रक्कम काढता येईल, १९ नोव्हेंबर २०१६ नंतर ही मर्यादा वाढवून चार हजार रुपये प्रती कार्ड याप्रमाणे रक्कम काढता येईल. दि. ३० डिसेंबर २०१६ पर्यंत ज्यांना बॅँकेमध्ये किंवा रिझर्व्ह बॅँकेमधून जुन्या चलनातील नोटा बदलून घेता आलेल्या नाहीत अशा परिस्थितीत रिझर्व्ह बॅँकेच्या विशिष्ट कार्यालयांमध्ये ती बदलून घेण्याची व्यवस्था उपलब्ध असेल.  दि. ११ नोव्हेंबर रात्री बारापर्यंत जुन्या चलनातील बदलामुळे जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शासकीय रुग्णालये, शासकीय रुग्णालयातील औषधालये, रेल्वे तिकीट खिडकी, शासकीय सार्वजनिक वाहतुकीचे तिकीट घर आणि वायुसेवेची तिकीट खिडकी, ग्राहक सहकारी सोसायटी, दुग्धालये, पेट्रोल पंप अशा ठिकाणी जुन्या चलनातील नोटा वापरात येऊ शकतील. आज मितीस सर्व बॅँकांकडे चार ते पाच दिवस पुरेल इतके ५०, १०० चे चलन उपलब्ध आहे. याशिवाय रिझर्व्ह बॅँकेकडे तीन दिवस पुरेल इतका चलन साठा उपलब्ध आहे. रिझर्व्ह बॅँकेने तीन गाड्या व तीन अतिरिक्त अधिकारी चलन पुरवठ्यासाठी सज्ज ठेवले आहे.  दि. ११ नोव्हेंबरपासून बॅँक कामाचा बोझा लक्षात घेता जनतेच्या सोयीच्या दृष्टीने बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेच्या एक तास अगोदर बॅँकेत कामकाजाकरिता हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.  बॅँकेकडील अतिरिक्त कामाचा बोझा लक्षात घेऊन सर्व बॅँक शाखांमध्ये अतिरिक्त काउंटर्स व अतिरिक्त कारकून देण्याची सूचना देण्यात आली आहे. पर्यटनस्थळी पर्यटकांना आवश्यक चलन उपलब्ध नसण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत पर्यटन क्षेत्रातील सामाजिक संस्थांनी पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे.