गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेशोेत्सव अपेक्षेनुसार साजरा करता आला नव्हता. त्यामुळे सार्वजनिक मंडळे जोरात आहेत. त्याबरोबर घरोघरी उत्साह आहे. कोरोनाच्या काळानंतर या उत्सवामुळे बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. नाशिक महापालिका आणि नाशिकमधील शाडू माती मूर्तिकार संघटनेच्या वतीने पर्यावरणपूरक उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी यंदा महात्मा फुले कलादालनात पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रदर्शन भरविण्यात आले असून, २२ मूर्तिकारांना विनामूल्य स्टॉल्स देण्यात आले आहेत. याशिवाय पर्यावरणपूरक सजावटीचे साहित्यदेखील विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्थात, नागरिकांत उत्साह असला तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेता मूर्तिकार आणि अन्य व्यावसायिक मात्र सावध आहेत. गेल्या वर्षी मूर्तिकारांनी खूप मोठ्या प्रमाणात मूर्ती घडविल्या नव्हत्या किंवा पेण आणि अहमदनगरसारख्या ठिकाणाहून देखील बेतानेच मूर्ती मागविण्यात आल्या आहेत.
कोट...
गणेशमूर्तींची संख्या यंदा मर्यादित आहे. बहुतांश मूर्तिकारांनी यंदा बेतानेच मूर्ती तयार केल्या असून, त्या गतवर्षीच्या तुलनेत देखील ५० टक्के कमी आहेत. अर्थात मागणीदेखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही.
- संताेष शहरकर, व्यावसायिक
इन्फो...
इको फेंडली सजावट
पर्यावरणस्नेही देखाव्यासाठी यंदाही अनेक प्रकारचे सजावटीचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे. थर्माकोलला फाटा देत कार्डशिट, लाकडी मखर, संगमरवरी मखर, हँड मेड पेपर, टिन्टेड पेपर, कोरूगेटेड पेपर या साहित्यापासून प्रामुख्याने सजावटीचे साहित्य तयार करण्यात आले आहे.