नाशिक : जिल्ह्यातील शाळांमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करून निकाल जाहीर करण्याची परंपरा आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही ध्वजारोहण होणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून गटशिक्षण अधिकारी,प्रशासन अधिकारी, मुख्याध्यापकांना सूचना केल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिल्ह्यात एकाच ठिकाणी ध्वजारोहण करण्याची सूचना शासनाने केली आहे; परंतु गेल्यावर्षी अशाप्रकारच्या सूचना केल्यानंतर शिक्षण विभागाने शाळांसाठी स्वतंत्र परिपत्रक काढून याविषयी सुचित केले होते; मात्र यावर्षी अशा सूचना नसल्याने शाळांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याविषयी लोकमतने शुक्रवारी (दि.३०) वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जाग आली आहे. शिक्षण विभागाने तत्काळ परिपत्रक काढून शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात एकच ठिकाणी ध्वजारोहण होणार असल्याचे स्पष्ट करीत १ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ शाळेत साजरा करण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत.
===Photopath===
300421\30nsk_28_30042021_13.jpg
===Caption===
ध्वजारोहण