शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

विकासनिधीबाबत पत्रकात उल्लेख नाही

By admin | Published: August 06, 2016 1:12 AM

आयुक्तांची स्पष्टोक्ती : महासभेच्या ठरावानंतरच कार्यवाही

नाशिक : नगरसेवकांना त्यांच्या प्रभागांमध्ये विविध कामे करण्यासाठी देण्यात येणाऱ्या विकासनिधीची चर्चा वारंवार होत आलेली असताना माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यांच्या कारकीर्दीत सादर केलेल्या अंदाजपत्रकात विकासनिधीबाबत एकाही पैशाचा उल्लेख नसल्याची स्पष्टोक्ती नूतन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्थायी समितीच्या सभेत बोलताना केली. महासभेने संमत केलेल्या अंदाजपत्रकाचा ठराव प्राप्त झाल्यानंतरच विकासनिधीतील कामे हाती घेतली जातील, असेही कृष्ण यांनी सांगितले.गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेत नगरसेवक विकासनिधीवरून भांडत आले आहेत. माजी आयुक्त गेडाम यांनी सदस्यांचा विकासनिधी ५० लाखांवरून ३० लाखांवर आणला होता. त्यावरून महासभांवर वादळी चर्चा झडल्या होत्या. आताही चालू आर्थिक वर्षात विकासनिधीची तरतूद करण्यावरून प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष निर्माण झाला होता. माजी आयुक्तांनी अंदाजपत्रकात त्याबाबत तरतूद करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर महासभेवर अंदाजपत्रक सादर करताना स्थायीने ६० लाख रुपयांच्या विकासनिधीची तरतूद केली आहे. महासभेने अंदाजपत्रकाला मंजुरी दिली परंतु आता आॅगस्ट उजाडला तरी अद्याप अंदाजपत्रकाचा ठराव प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून सद्यस्थितीत आयुक्तांच्याच अंदाजपत्रकानुसार कामकाज चालविले जात आहे. स्थायी समितीच्या सभेत विकासनिधीचा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी नूतन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले, सद्यस्थितीत प्रशासनाकडे आयुक्तांचे अंदाजपत्रक असून त्यात विकासनिधीबाबत एकाही पैशाचा उल्लेख नाही. त्यामुळे विकासनिधीबाबत कामे हाती घेता येणार नाहीत. महासभेचा ठराव येत नाही तोपर्यंत लेखी आदेश काढू शकत नाही. गटनेत्यांची बैठक होईपर्यंत खातेप्रमुखांकडून कामांची यादी मागविण्यात आली असून त्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. महासभेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर विकासनिधीची मर्यादा निश्चित करता येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)