नाशिक : राजकारण एकप्रकारचे नाटक असून, येथे राजकीय नेत्यांना सतत अभिनय करावा लागतो. अनेकदा मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी खोटंही बोलावं लागतं. खोटं बोलल्याशिवाय राजकारण चालूच शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.राज्यात सध्या निवडणुकांमुळे राजकिय वातावरण तापले आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अच्छे दिनच्या प्रचाराविषयी देखील असे काही नसल्याचे सांगून वाद ओढावला होता. आता मतदारांची फसवणूक करत असल्याचे राज्यमंत्र्यांनी जाहिर कार्यक्रमात सांगितल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.शनिवारी (दि.२) श्री राजे छत्रपती मंडळातर्फे पाटील यांच्या हस्ते २५ जणांना जीवनगौरव व २६ जणांना गोदागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेसह अन्य सहकारी संस्थांची दुरवस्था झाली असून, एनपीए ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सहकारी संस्थांनी कामगिरीत सुधारणा करण्याचा सल्ला त्यांनी दिला. गुलाबराव पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना करावी लागणारी कसरत उपस्थिताना सांगताना राजकारणात खोटं बोलून मतदारांची मर्जी सांभाळावी लागत असल्याची खंत बोलून दाखवली. खरे बोलले तर नागरिकही राजकीय व्यक्तींवर विश्वास ठेवत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
खोटं बोलल्याशिवाय राजकारण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:32 AM
नाशिक : राजकारण एकप्रकारचे नाटक असून, येथे राजकीय नेत्यांना सतत अभिनय करावा लागतो. अनेकदा मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी खोटंही बोलावं लागतं. खोटं बोलल्याशिवाय राजकारण चालूच शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.
ठळक मुद्देगुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य