प्रभाव लोकमतचानाशिक : आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांपैकी नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी आॅनलाइन अर्जात खोटे पत्ते व चुकीच्या जन्मतारखा नोंदविल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. या प्रकाराची प्राथमिक शिक्षण संचालनालयाने गंभीर दखल घेतली असून, दुसरी सोडत जाहीर करण्यापूर्वी ज्या पालकांनी आॅनलाइन अर्जात खोटे पत्ते नोंदवले आहे, अशा पालकांना अर्जात बदल करण्याची संधी नाकारली आहे.आरटीई प्रवेश प्रक्रियेतील पहिली लॉटरी ८ एप्रिल रोजी काढण्यात आल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दुसºया सोडतीपूर्वी पालकांना आॅनलाइन अर्जांमध्ये दुरुस्ती व फेरबदल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यात ज्या पालकांनी अर्ज भरला, परंतु निश्चित (कन्फर्म) केला नाही. त्यांना तो निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ज्या पालकांना लॉटरी लागली नाही. अशा पालकांना त्यांचे गुगल लोकेशन चुकले असल्यास ते दुरु स्त करा येणार आहे. गुगल लोकेशन दुरुस्त केल्यानंतर शाळांची निवड नव्याने करणे आवश्यक आहे. मात्र अशा पालकांना त्यांच्या पाल्यांची जन्मतारीख व नावात बदल करता येणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले असून, ज्या पालकांना पहिल्या फेरीत लॉटरी लागली, परंतु अंतराच्या अडचणीमुळे प्रवेश घेऊ शकले नाही अशाच पालकांच्या तक्रारीची खात्री पडताळणी समितीने करणे व पालकांची चूक किंवा तांत्रिक चूक असल्यास गुगल लोकेशन व शाळा निवडीत दुरुस्ती करण्याच्या सूचना संचालनालयाने केल्या आहेत.मात्र ज्या पालकांनी घराचे अंतर ३ कि.मी.पेक्षा अधिक असताना जाणीवपूर्वक १ किमीच्या आत दाखविले आहे अशा पालकांना पडताळणी समितीने अपात्र ठरविले आहे. अशा पालकांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी सर्व जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी व मनपा प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत.
खोटे पत्ते देणाऱ्यांंच्या अर्जात दुरुस्ती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:50 AM