शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

शहरात आज भाजीवाल्याचा आवाज गुंजलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 1:01 PM

नाशिककरांना मंगळवारच्या भोजनात पालेभाज्यांव्यतिरिक्त डाळींवर भर द्यावा लागला. शहरातील विविध उपनगरांमधील भाजी मंडईंमध्ये शुकशुकाट पहावयास मिळाला.

ठळक मुद्देबिटको चौकात उड्डाणपूलाखाली भाजी बाजाराची लगबग नाहीभद्रकाली भाजी बाजारातही शुकशुकाट भाजीपाला नाशिककरांना मिळणे मुश्कील

नाशिक : एरवी दररोज दिवस उजाडताच शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये भाजीवाल्याचा आवाज गुंजतो, मात्र मंगळवारी सकाळी हा आवाज नाशिककरांच्या कानी पडलाच नाही, कारण शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी दिल्लीतून पुकारलेल्या 'भारत बंद' या आंदोलनात कानाकोपऱ्यातील शेतकरी सहभागी झाला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर जाणे पसंतच केले नाही. शेतमालाचा उठाव होऊ शकला नाही, आणि बाजार समित्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा शेतमाल बळीराजाने पोहचविला नाही, यामुळे नागरिकांची चांगलीच फजिती झाली.

परिणामी नाशिककरांना मंगळवारच्या भोजनात पालेभाज्यांव्यतिरिक्त डाळींवर भर द्यावा लागला. शहरातील विविध उपनगरांमधील भाजी मंडईंमध्ये शुकशुकाट पहावयास मिळाला. काही ठराविक चौकांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी भरणारा भाजीबाजार मंगळवारी सकाळी गजबजला नाही.

नाशिकरोडमधील बिटको चौकात उड्डाणपूलाखाली भाजी बाजाराची लगबग दिसली नाही. सातपूरच्या भाजी मंडईदेखील ओस पडलेली होती. साईनाथनगर भाजाी बाजारही सकाळी भरला नाही. भद्रकाली भाजी बाजारातही शुकशुकाट दिसून आला. भाजीपाला नाशिककरांना मिळणे मुश्कील झाले होते. यामुळे बहुतांश चाकरमान्यांनासुध्दा आज डब्यांमध्ये कुठल्याहीप्रकारच्या पालेभाज्या मिळू शकल्या नाहीत.

टॅग्स :NashikनाशिकBharat Bandhभारत बंदFarmer strikeशेतकरी संपAgriculture Sectorशेती क्षेत्र